Posts

Showing posts from December, 2020

सरते वर्ष..

Image
सरते वर्ष.. २०२० हे वर्ष सुरु होण्यापूर्वीच विश्वावर कोरोना सारख्या जागतिक महामारीचे सावट उभ ठाकलं होतं.संपूर्ण जग एकाच वेळी भयभीत झाल असावा अशी स्थिती. मानवाने कितीही प्रगती केली तरी मृत्यूला तो रोखू शकत नाही.याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याशिवाय राहत नाही.कोरोना विषाणू मानव निर्मित असल्याचेही समजले.त्यात किती तथ्य माहीत नाही.पण या विषाणूने असंख्य माणसं गमावली हे नाकारून चालणार नाही.२०२० हे वर्ष तस भीतीच्या सावटाखाली गेलं.अजून धोका टळला नाही.पण मानवाने जणू ह्या कोरोनाच अस्तित्व स्वीकारला आहे,अस जगतोय.    २०२१ हे वर्ष तरी किमान आशादायी असावा ही  माझ्यासारखी अपेक्षा व इच्छा बहुसंख्य लोकांची असावी.या वर्षीचा संकल्प आहे त्यात कसे सुरक्षित राहावं हा विचार व्हावा.सर्वांचे दैनंदिन जीवन किती विस्कळीत झाला आहे याची कल्पनादेखील करवत नाही.नोकऱ्या नाहीत,शाळा असून नसल्यासारखी, मोकळेपणाने कुठं-कुणाकडे जाणं-येणं नाही,मानसिक व शारीरिक ताण,आर्थिक विवंचना,आरोग्य विषयी चिंता अशा अनेक समस्या सोबतीला आहेतच.   २०२० या वर्षात अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे.काहींनी तर एकापेक्षा जास्त म...

कुणी तरी लेखक कवी आपल्या आयुष्यात ही असावं..

Image
कुणी तरी लेखक-कवी  आपल्या आयुष्यात ही असावं.. कुणी तरी लेखक-कवी  आपल्या आयुष्यात ही असावं.. आपल्या हसण्या-रडण्यावर,   रुसण्या-हिरमुसण्यावर,  रागावर-प्रेमावर अन सगळ्या गमतीजमतीवर,  दिसण्यावर-भासण्यावर,   दुःखाच्या वाटेवर अन सुखाच्या रथावर,  आपल्या हातून घडणाऱ्या चुकीवर अन कर्तृत्वावर..  खरचं कुणी तरी आपल्या जाणते अजाणतेपणे आपलं अस्तित्व टिपणारं,  आपल्या असण्या-नसण्यावर,   आपल्या जाण्यानंतर स्वतःचे शब्द देवून  आपल्याला जीवन देणारं,   मनसोक्त आपलं कौतुक करणारं,  कोणी तरी आपला प्रवास कागदावर मांडणार,   लेखक-कवी आपल्या आयुष्यात असावंच ! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

मायेची माय माझी..

Image
माझ्या आज्जीचा(आईची आई)रती आईचा आज २३वा स्मृती दिवस ! तिच्या आठवणीने मन व्याकुळ होतंय. तिच्यासाठी लिहिलेल्या या चार ओळी तिला समर्पित ! मायेची माय माझी.. मायेची माय माझी होती,   रती,रत्या,रत्नमाला तिला म्हणती.  दुधावरची साय मी तिची,  होती ती माऊली जगाची.  परक्याला आपलंस करणारी, धरणी ती..समदं आपल्यात समावणारी.  प्राण्यांना ही वाटे तिचा आधार, सगळ्यांच्या पोटाला वाढे भाकर चार. काळाने मात्र घाला घातला, माऊलीला आमच्या दूर घेवून गेला.  नातवंडांमध्ये रमण्याची हौस होती तिला, पोरकी करून पोरं,डाव अर्ध्यावर सोडला.. स्मृती दिवस डिसेंबर सत्तावीस, वर्ष आज झाली पूर्ण तेवीस. स्मरण माऊलीचे सदा आमच्या मनी, दंडवत माझा दोन्ही कर जोडोनी ! प्राची दुधाने

माय बाप शेतकरी

Image
सवताच्या पोटाला घेवूनी चिमटा माय बाप शेतकरी, जगासाठी धन धांन्याची  रास उभारी.. गडी आध्या रातीला बारं धरी. ढवळ्या अन पवळ्या येळमाळं संगतीला,  धावून जाय धन्याच्या मदतीला. इमानदारीचा मळका सदरा, बेईमाना परीस रुबाब करी.  वरिसभर काळ्या मातीत गाळतो घाम, पर त्याच्या कष्टाला कवा मिळल खरा दाम ?  वाट बघणं एवढं मातुर उरलं त्याचं काम.. यळवर पाऊस अन बत्ती नाय, बेफान बरसला,तरी डुईवर भार हाय, अशा वक्ताला करावं काय ? या इचारानं गडी बावरून जाय.. पोरीचं लगीन जोरात वाजवीन, बेट्याला मोटा साहेब बनवीन. सपान त्याचं व्हाऊन जाय, सपरात बसून रडं माय.. सरकार इलाज काढील आता हिचं उरली आसा, तीन बिलांनं मातुर पूर्ती केली निरासा. ढेंकूर देयून बसल्या शेठला काय, गोरगरिबांची जाण नाय ! जगाचा ह्यो पोशिंदा, ठरिवलं तर पाडील बंद तुझा धंदा.. कोणी तरी सांगावं त्या वामन्याला, बळीचा वारस हाय त्यो.. जरा जपून..नाय तर जुंपीन तुलाच नांगराला !! प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

नाही सत्ता तरी राजा !

Image
नाही सत्ता तरी राजा ! आजच्या पोस्टचा विषय फार वेगळा आहे. मी नेहमी माझा लेखनाबरोबर एक इमेज त्यावर आधारित सुविचारा सहित पाठवत असते.त्याने विषय समजायला आधार मिळतो असं मला वाटतं. मी सतीशला(जो डिझाईन बनवतो)त्याला सुविचार आणि त्यावर आधारित चित्र पाठवले की तो डिझाईन तयार करून पाठवतो.त्या दिवशी जास्तच उशीर झाला.मी काही पाठवलं नाही म्हणून त्याने मला एक डिझाईन स्वतः करून पाठवलं.आजच्या लेखा बरोबर जोडलेली  डिझाईन तीच.त्यावर त्याने जे लिहून त्या शेजारी चित्र पाठवलं होतं ते बघून,असं का पाठवले असेल ? असा पहिला प्रश्न मनात आला.पण त्याला तसं विचारलं तर पोरग हिरमुसायचं.म्हणून छान म्हटलं आणि गप्प राहिले.पण त्यावर लिहायचं हे ठरवलं होत.     साधारण काय लिहिले आहे,त्यावर मी डिझाइन ठरवते.पण आज त्याने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या  डिझाईन बद्दल थोडक्यात लिहित आहे.   सामाजिक जीवनामध्ये आपण वावरत असताना प्रत्येक मनावर आपण एक विशिष्ट छाप निर्माण करत असतो.आपल्या कार्याची,स्वभावाची ती पावती असू शकते.असू शकते,असं म्हटलं कारण काही लोकांना  तुम्ही कितीही चोंभाळल,त्यांच्याशी कितीही प्रेमाने ...

विरोधाभास

Image
विरोधाभास  आयुष्यत किती विरोधाभास असतात नाई.. आपण शिकतो एक,ऐकतो दोन,बोलतो तीन अन करतो चार.शाळेत शिक्षण घेत असताना आपल्याला काय काय ज्ञानाचा अन तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जातात. जात-पात मानू नका,भेदभाव पाळू नका,बंधुभाव निर्माण करा,एकमेकांचा आदर सन्मान करा,मानवता हाच खरा धर्म,खोटे बोलू नका,चोरी करू नका,संविधान हा आपला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ आहे,स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे,त्यांच्या प्रती व देशाप्रती आदर असावा,स्वातंत्र्याची किंमत समजून घ्यावी,दुसऱ्याच वाईट चिंतू नका,अशा एक ना अनेक बाबी एका दमात मावत नाही बाबांनो.. मला असं वाटतं Its not important what we learn now,is how we present the thought about it in future ! आपण आज जे शिकतोय त्याला अनुसरून आपण भविष्यात काही विचार सादर करू असं नाही.हे अनेकांना लागू होत.कारण विरोधाभास !    मी माझ्या मुलांना शिकवताना नेहमी सांगते(अर्थात अभ्यासाविषयी).इथ जे दिल आहे ते आपल्या ज्ञानासाठी.काय अपेक्षित आहे हे माहिती होण्यासाठी. पण प्रत्यक्षपणे जे ह्या बुकात आहे असं घडतच असं नाही.उदाहरण-न्याय व्हावा म्हणून कायदे केले जातात, प...

संत गाडगे (बाबा) महाराज

Image
संत गाडगे(बाबा) )महाराज मानवाला मानव म्हणून जगायला शिकवणारे.आयुष्यभर माणूस म्हणून मानवतेची बीज जनाजनात  पेरणारे. माणसांना शिक्षण व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे. अनावश्यक रुढी-परंपरा व त्यांच्या नावाने होत असलेली लूट,प्राण्यांची हत्या या विषयी जागृती निर्माण करणारे. जातिभेद व अस्पृश्यता,दीन,दुबळे अनाथ यांची सेवा करावी,मंदिरांवर पैसा खर्च करण्यापेक्षा शाळा/शिक्षण यावर खर्च करावा,  सावकाराकडून कर्ज काढू नका,व्यसनांच्या आहारी जाऊ नका हे व असे अनेक उपदेश संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनपर प्रबोधनातून गावोगावी फिरून लोकांना सांगत.    संत तुकाराम महाराज यांना आपले गुरू मानणारे संत गाडगेबाबा चालते बोलते ज्ञान भांडार होते.बाबा शिकलेले नव्हते,पण ज्ञानी होते.माणसातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी आपले सर्व सुख त्यागले.गाडगेबाबा यांच्या कविता आजच्या काळातही समर्पकपणे लागू होतात.बाबांचे द्रष्टेपण त्यांच्या विचारातून दिसून येते.संत गाडगेबाबा यांची 'देव'ही कविता जरूर वाचावी व समजून घ्यावी.देव आहे की नाही मुळात ही शंकाच आपल्या मनात उरणार नाही. इतकी सटीक मांडणी संत गाडगेबाबा यांनी केली...

मन धाव घेतंय,विरून गेलेल्या क्षणांचा ठाव देतंय..

Image
मन धाव घेतंय, विरून गेलेल्या क्षणांचा ठाव देतंय. वास्तवाचं भान राखतंय, इतिहासाचं पान वाचतंय. भूल अन चूक एकसंध रांधले, स्मरण त्याचे मनी बांधले. सुख,दुःखाचा जीवन ठेवा, सोपा नसे हा खेळ जाणावा. भूतकाळातील स्मृतिगंध जो, आठवणींचे रान फुलवितो. बुद्धीच्या ही पलीकडला, तर्क भावनांचा कोण लावतो ?  क्षणाची त्या पत जाणं, निसटून जाता देईल कोण ? गेला क्षण न येई परतोनी, वर्तमान ही शिळा होई घे समजोनी. आठवणी गेल्या जरी विरून, मनातून कोण नेईल त्यास चोरून ? क्षणा क्षणांचा ठाव घे, आठवणींचा गाव ले.. प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

दिवस एक विश्रांतीचा असावा !

Image
दिवस एक विश्रांतीचा असावा ! धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस  विश्रांतीचा असावा,  थकलेल्या जीवाला काही क्षणांचा विसावा मिळावा. दूर लोटून सारे ताप, असो कितीही व्याप. ओलांडून कष्टी आयुष्याचे माप, सुखी क्षणांची देणगी घ्या अमाप. वरवर अस्थिर अशांत मनाच्या,  खोलवर सुप्त जाणिवा शांततेच्या. विश्रांती म्हणजे नसे केवळ निद्रा, हो निरीक्षक स्व विचार अन कृतीचा  ना की कृत्रिमतेचा ! कर मना प्रसन्न घेऊनी विश्रांती, प्रसन्न मन होईल आयुद्ध तुझे लढण्या आव्हानांना सम. आराम घे देहाचा अन मनाचा, अवलंब एकमेकां एकजुटीचा. आयुष्य हे धकाधकीचे, पाण्या सम गढूळलेल्या. तळ दिसेल तुझं मनुजा, स्वच्छ ठेविसी जर मना.  स्वस्थ देहाची दवा स्थिर मन, मिळे विश्रांती जेव्हा त्यास. निवडलेल्या वाटेवरून फिरू नको माघारी थकून,  दे विश्रांती जीवाला जरा बसून. पुढे वाट पाहे तुझी वाट, पार कर आता ही वाट दाट. किती जरी क्षण बिकट, आयु असे असेच चिवट. तरी..धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस  विश्रांतीचा असावा,  थकलेल्या जीवाला काही क्षणांचा विसावा मिळावा. प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

नात्यांचा आठवणीतील गंध..

Image
नात्यांचा आठवणीतील गंध सतत दरवळत राहो.. कालपण,आजपण,उद्यापण..! प्रिया आणि मनोहर,हेवा वाटावं असं प्रेमळ जोडपं. लग्नाला १० वर्ष पूर्ण झाली होती.अभय,त्यांचा मुलगा ८ वर्षांचा होता.प्रिया शिकलेली,पण मुलासाठी नोकरी सोडली आणि घरातून काही काम करू लागली.मनोहर एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसा कामाचा व्याप ही वाढत होता.एके दिवशी मनोहरच्या ऑफिस मधून फोन आला. तातडीने ऑफिस जवळच्या दवाखान्यात या असा निरोप दिला.मनोहरला काही तरी झालं आहे हे प्रियाला  समजलं.तिच्या भावाला फोन करून तिने दवाखान्यात बोलावून घेतलं.अभय तिच्या सोबत होता.मनोहरला हृदयविकाराचा झटका(heart attack)आल्याचे प्रियाला डॉक्टरांनी सांगितलं.प्रियाला धक्काच बसला ! काय करावं तिला समजेना.तिचा भाऊ तिच्या पाठोपाठ दवाखान्यात पोचला होता.वाट बघणं सोडून बाकी काहीच त्यांच्या हातात नव्हतं.साधारण २-३ तासाच्या उपचारानंतर डॉक्तरांनी मनोहर गेल्याची बातमी दिली. हृदय विकाराचा तीव्र झटका मनोहर सहन करू शकला नाही.प्रिया हे ऐकून सुन्न झाली.शरीरातला सगळा त्राण गेल्यासारखं तिला जाणवलं आणि ति कोसळली. ती बराच वेळ बेशुद्धावस...

धुक्याची वाट..

Image
धुक्याची वाट..  दाट ती धुक्याची वाट,   त्या पल्याड दिसे सर्व स्पष्ट. अनिश्चितते पल्याड संधी असे,  त्या सम धुक्यातून तुझ वाट गवसे. धुके अडथळा किरणांना होय अवनीवर पोचण्या, अस्पष्टता वाटेतील रोडा, धेय्या तुझ्या नेई आड. उमेद हरपे अशा या धुक्यात.. पण धुके करील जरी वाट अंधुक, हक्क नसे तीस मार्ग हरपण्यास. घे खोल श्वास,कर मन घट्ट, चाल पुढे विश्वासाने सोडू नको हट्ट. धुके जरी दाटले,   नाही नभ फाटले. निवड तुझा मार्ग,  होईल जीवन सार्थ. प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन

निखळ मैत्री..त्याची अन तिची !

Image
निखळ मैत्री निखळ मैत्री त्याची अन तिची. काय,आश्चर्य वाटलं ? डोळे विसफरले ? मला वाटलच.. मैत्री..त्याची अन तिची. तो तिचा बाप,भाऊ,नवरा,मुलगा,काका,मामा, कोणी ही असू शकतो, अन कोणी नसू पण शकतो ! त्याचं ही असच,तिच्यासारखा नातं असत. पण त्याकडे संशयाने बघणं, जरा अति नाही का वाटत ? असतात हजारो फेक,   ती/तो एक नेक. इतकं साधं गणित, त्यात कशाला ओढता रेघ.. चांगल्या मैत्रीला नसावा बांध, हजारो तारे मैत्री एक चाँद. जी ऐकते,सोसते,काही करायला तयार असते, मैत्री अशी जी जीवावर उदार होवून हसते. मैत्री धैर्य,मैत्री मनमोकळेपणा, समाजाच्या परिघाबाहेर तुमच्या भावनांना मिरवून आणते..ती मैत्री भरून पावते ! अंधारातून उदयाकडे घेवून जाते ती मैत्री, अन चुकीच्या प्रवाहा विरुद्ध पोहायला शिकवते, ती असते मैत्री ! त्याची तिची मैत्री अशीच असते, जग मात्र त्यांच्या भावनांना तोलून बसते. एक निखळ मैत्री किती काय करते, दुःख सगळे घेवून सुखाच दान देते,  अन विश्व सारं,उमलू पहाते.. विखारी ते भाव समाजाच्या नजरेतील, मैत्री टीपत असते, तुझे माझे विभक्त असणेच,  योग्य समजू लागते. तरी,तिची त्याची मैत्री पाण्याचा तळ स्पष्ट द...

१० डिसेंबर..आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन !

Image
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस        १० डिसेंबर २०२० UNHRO संयुक्त राष्ट्रसंघ मानवधिकार कार्यालयाच्या नेतृत्वात जगभरात १० डिसेंबर हा दिवस  'आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस' म्हणून साजरा केला जातो.१० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र पॅरिस येथे स्वीकारले होते.संयुक्त राष्ट्रसंघाने पुढे १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन/दिवस म्हणून जाहीर केला.    मानवाचे अधिकार व हक्क ही कोणाची जहागिरी नाही.प्रत्येक मानवाला त्याचे हक्क,अधिकार स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य समाजातील प्रत्येक व्यक्तीचे अबाधित राहिले पाहिजे.प्रत्येक मानवाला सन्मानपूर्वक जीवन जगता यावे या उद्देशाला अनुसरून १० डिसेंबर हा दिवस त्या प्रती जागृतता निर्माण करण्यासाठी म्हणून त्याकडे पाहिले जावे.अर्थात एक दिवस असावा असं नाही.    मानवाला मूलभूत अधिकार प्राप्त होणे आवश्यक आहे.कोणताही भेदभाव कोणत्याही व्यक्तीला तिचे मानवी हक्क व अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही.तिचे राष्ट्रीयत्व,लिंग,जात,धर्म,वर्ण,भाषा,निवास,  इत्यादी भेदभ...

सोनिया गांधी.. सोनेरी हृदय असणारी भारतीय स्त्री ! Sonia Gandhi..A Bhartiya Lady With Golden Heart !

Image
सोनिया गांधी..सोनेरी हृदय असणारी स्त्री ! Sonia Gandhi..A Lady With Golden Heart ! सोनियाजी यांचा जन्म इटलीत,शिक्षण इंग्लंडमधे व नंतर लग्न भारतात झालं.भारतात आल्या तेव्हापासून सोनियाजी भारताशी जोडल्या गेल्या ते आजपर्यंत. दिवसेंदिवस भारताशी असलेले त्यांचं नातं घट्ट होत गेले.स्वर्गवासी भारताच्या पूर्व पंतप्रधान इंदिराजी यांनी सोनियाजी यांना भारताच्या संस्कृतीचे मूळ तत्त्वे शिकवली व मुलीसम वागणूक दिल्याचे सोनियाजी सांगतात.राजीवजी यांच्याबरोबर सोनियाजी यांचा प्रेमविवाह.पण माणूस एखाद्यावर इतका प्रेम करू शकतो,हे सोनियाजी यांच्याकडे पाहिल्यावर खरं वाटतं. इंदिराजी यांच्या हत्येनंतर राजीव यांच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आली.त्यातही सोनियाजी यांनी पत्नी या नात्याने पूर्णतः साथ राजीवजी यांना दिली.पण इंदिराजींच्या मृत्यूच्या काही वर्षातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने काय केलं असत ? एक तर घाबरून सगळं सोडून गेली असती अथवा राज्यकारभाराचा पुरेपूर गैरफायदा घेतला असता.पण त्या सोनिया होत्या,इंदिराजींची स्नुषा व राजीव यांच्या पत्नी.पंतप्रधान पद नाकारून पक्षाची जबाब...

महाराणी भद्रकाली ताराराणीसाहेब स्मृतिदिन !

Image
महाराणी भद्रकाली ताराराणीसाहेब यांचा                    आज स्मृतिदिन.. "दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी | ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली || ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते | खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली || रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली | प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || " तत्कालीन कवी यांनी महाराणी ताराराणीसाहेब यांचे जे वर्णन केलं आहे ते निश्चितच त्यांचा लढवय्याबाणा,पराक्रम,कर्तृत्व सिद्ध करण्यास समर्पक आहे.    आज महापराक्रमी छत्रपती महाराणीसाहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पराक्रमी जीवनाविषयी मोजक्या शब्दात माहिती(जे थोड अवघड आहे)देण्याचा प्रयत्न करत आहे. *जन्म-१६७५ *वडील-सरसेनापती हंबीरराव मोहिते (छ.शिवाजी महाराज यांचे सरसेनापती) *१६८३-८४ दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांच्याबरोबर विवाहबद्ध. *१६९६ पुत्र प्राप्ती नाव शिवाजी  *३ मार्च १७००छ.राजाराम महाराज यांचा मृत्यु *१७०० राज्यभिषेक *१७०० ते १७०७ कार्यकाळ  ह्या काळात त्यांनी मोगलांची पळताभुई थोडी अशी अवस्था केली होती.महारान...

८/१२/२०२० शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठींबा !

Image
आज खुप काही लिहिणार नाही. मुद्द्याचं बोलणार.. उद्या ८/१२/२०२० केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला जाहीर पाठींबा ! तुम्ही देताय ना पाठींबा आपल्या कष्टकरी शेतकऱ्याला ? तुम्ही घाबरलात तर असाच तुमच्या आयुष्याचा निर्णय कोणी दुसरे घेत रहातील,हे लक्षात घ्या ! शेतकरी नाही तर,  अन्न नाही,  भविष्य नाही ! माझा शेतकरी,माझा पाठींबा ! भारताच्या विस्कटलेल्या व्यवस्थेला जागेवर कोणी घेवून येईल तर तो कष्टकरी शेतकरीच.. प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन           व  सर्व समविचारी व्यक्ती/संघटना

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाभिवादन !

Image
६ डिसेंबर..डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र शिवाभिवादन ! ६ डिसेंबर..बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन.आज ज्ञान खऱ्या अर्थाने पोरकं झाल असेल.कारण ज्ञान काय असतं व ते कसे संपादन कराव,त्यातून जनकल्याणाचा मार्ग कसा निर्माण करायचा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.आज बाबासाहेबांच्या विषयी अनेक भावना व्यक्त होतील.त्यांच्या बद्दल कितीही लिहिले तरी कमीच.मुळात त्यांनी जे लिहून ठेवला आहे ते समजून घेण्याची सुद्धा आपली अवपत नाही कधी कधी असं वाटतं.कारण आपण बाबासाहेबांचे विचार पूर्णतः कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. ते केल पाहिजे.आज बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक छोटासा प्रयत्न,त्यांचे दोन-चार विचार आपल्या समोर मांडून करत आहे.   बाबासाहेबांचे विचार खूप प्रगल्भ होते.त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास ही दांडगा होता.ते म्हणायचे ज्यांना इतिहास माहीत नाही,ते इतिहास घडवू शकत नाहीत. हे निश्चितच खरं आहे.इतिहास हा एक मागोवा असतो. जो आपल्या वर्तमान व भूतकाळ यासाठी मार्गदर्शक ठरतो.अनेक चुका,कर्तुत्व,बदल इत्यादी घटनांचा इतिहास साक्षीदार असतो....

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिनानिमित्त शिवाभिवादन !

Image
६ डिसेंबर..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याचा स्मृतिदिन  !🚩👏🏻 लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले,सत्यशोधक, प्रयत्नशील,परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले, उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील.सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले.  आज देश स्वातंत्र्य होवून ७०हून अधिक वर्ष झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे.नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणात आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे वि...

जीवन-मृत्यू मधील अंतर,आयुष्य जगण्याचा खरा मंतर !

Image
जीवन मृत्यू मधील अंतर, आयुष्य जगण्याचा खरा मंतर ! जीवन मृत्यू एकाच रस्त्याची सुरुवात व अंत आहेत. मृत्यू हे जीवनातील सर्वात मोठी हानी नसून,जीवन मृत्यूच्या भयाने जगण्यात तोटा आहे.इथे जिवंत कोणीच मुक्त होत नाही.मृत्यूशय्येवर प्रत्येकाला एक दिवस चढाव लागत. जे संपते ते आयुष्य, जो येतो तो मृत्यू. शब्दांचा सारा खेळ.. संपणारे असले आयुष्य तरी तेच खरे, बाकी काही जरी नसले बरे. मृत्यू येतो अन सारं घेवून जातो, आठवणींनी उर भरतो. आयुष्य उदार अंतकरणाने व्यापक विचाराने जगा. प्रेम,आनंद,विश्वास प्रस्थापित करा.किती जरी चकवा मृत्यूला दिला,तरी तो चुकणार नाही.हे वास्तव आहे.पण ह्या कटू सत्याला सामोरे जाताना,धैर्याने उभे रहा. मनावरील जखमांना काळाचे मलम लावा.संघर्षाच्या राखेतून फिनिक्स पक्षासम पुन्हा उभारी घ्या.मृत्यूचे भय जिवनावर स्वार होऊ देऊ नका.मृत्यू अटळ आहे. आपण अमर निश्चित नाही,पण आपले विचार,कार्य असे निर्माण करा जे आजारावर होईल.जेव्हा जेव्हा तुमचं नाव निघेल जीवन जगण्याची नवं चेतना तुम्ही द्याल.विचाराने तुम्ही कायम जिवीत रहाल.   सखोल जीवन जगणारे मृत्यूचे भय बाळगत नाहीत. दुःख जीवन देते,मृत्यू जीवन घेत...

देशभक्तीचे बीज !

Image
देशभक्तीचे बीज ! देशभक्ती गिरवण्यात अन मिरवण्यात नसते, ती श्वासाच्या अन हृदयाच्या प्रत्येक स्पंदनात वसते. आंधळेपणाने सरकारला पाठींबा,  समजा देशभक्तीच्या नावाला काळीमा.  देश म्हणजे सरकार अन  सरकार म्हणजे देश नसतोय,  हा देश माझ्या भारताच्या प्रत्येक बांदावर अन बांधवात वसतोय.  तिरंग्यामध्ये सामावलेला,विविधतेने नटलेला, शेतकरी संग कष्टकरी मिळोनि उभारलेला,  वीरांच्या बलिदानाने हा देश आहे वसलेला. निष्ठा असते देशाप्रती,  खऱ्या खोट्याची जनास असो प्रचिती. जमात होवू नका गुलामाची,   सरकार किती येती अन जाती. देशभक्ती तीच खरी,  जी चुकीला प्रश्न करी. अनिष्ट शासकाचा जो आज्ञाधारक, देशहितास होईल तो मारक. देशभक्ती म्हणजे देशासाठी लढणे,  ना की अंध बनुनी प्रधानाला मिळणे.  जेथे नसे विश्वास,  तेथे आज्ञा कशी करेल वास ? अंधबुद्धीचा पालनकर्ता गुलाम असतो, परी देशद्रोही तो इतरां समजतो. विरोध जो करतो हुकूमशाहीला, मुकेल कसा तो देशभक्तीला. नुसती छाती फुगवून,झेंडा फडकवून, नसे देशाप्रती खरा मान. एकत्र निर्माण करूनी सशक्त भारत, यातच खरा अभिमान. सामोरं जा त...

स्त्रीचे स्त्रीत्व नक्की दडले कशात ?

Image
स्त्रीचे स्त्रीत्व नक्की दडले कशात ?  स्त्री ही एक मानव सोडून सगळं काही आहे. हे येणाऱ्या अनुभवातून आपण बघतो,ऐकतो व  शिकतोच.रोज काही ना काही स्त्रीच्या स्त्रीत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना समोर येत असतात.  काल परवा बातम्या बघत होते.मंदिर,स्त्री,पेहराव हे  शब्द कानावर पडले.कोल्हापूरची बातमी दाखवत होते. महालक्ष्मी मंदिर परिसर दृष्टीस पडला.पत्रकार काही महिला व पुरुष यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेत होते.देवळात दर्शनासाठी येणाऱ्या स्त्रिया व त्यांचा पोशाख हा विषय होता.शिर्डी साई देवस्थान यांची ही काही सम बातमी ही असल्याचं समजलं.महिलांनी देवस्थानांमध्ये दर्शनास येताना साडी परिधान करावी असा विषय रंगला होता.साडी म्हणजे फक्त साडी नसून "हिंदू संस्कृतीला शोभनीय"असे वस्त्र असा त्याचा अर्थ.     स्त्रियांनो आता कुठे कुठे विरोध करायचा ठरवा ग बायांनो.उद्या नऊवारी नेसून डोक्यावर हातभर पदर घेऊन या असा फतवा निघाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.कारण तुमचं स्त्रीत्वच आज ह्या आधुनिक युगात तुमच्या कपड्यातून मोजमापन होते हे विसरू नका. स्त्रियांचे आज देखील त्यांच्य...

थकवा अन कंटाळा..

Image
थकवा अन कंटाळा.. थकवा आला की आराम करायचा असतो,   कंटाळा आला तर विरंगुळा शोधायचा असतो.  हे कळत असत,पण वळत नसतं.  कंटाळा कधी स्वतःचा येतो,  तर कधी रोजच्या वेळापत्रकाचा.  थकवा कधी कामाने येतो,  कधी नुसत्या घामाने सतावतो.  कंटाळा पिढ्यानं पिढ्यानंच्या  रूढी परंपरांचा असतो,  थकवा त्यांच्या ओझ्याने ही जाणवतो.  मी हसून तो वागवतो,  तो जड नाही असं भासवतो.  खोल श्वास घेवून,  हृदय अन मनावरचे ओझे धुवून.  चेहऱ्यावर हस्य फुलवून, थकलेले खांदे असतो उंचावून.  ह्या थकव्याचा ही आता कंटाळा आलाय,   अन कंटाळ्याचा थकवा जाणवायला लागलाय. पण थकून चालणार नाही, कंटाळून मी बसणार नाही. ह्या क्षणाच्या भावनांना, मी शरण कसा जावू. आयुष्य माझंच उध्वस्त करण्या,  माझ्या मनाचा ताबा मी कसा देवू. एक घोट घेतो मस्त चहा-कॉफीचा, तास एक घेतो विश्रांतीचा. काय नी कशासाठी राबत आलो, एक तो विचार अन मी झालो. उत्तर माझे मलाच उमगले, का थकलो का कंटाळलो. प्रश्न माझा मीच सोडविला, मार्ग होता हा मीच निवडला. हा थकवा आणिक कंटाळा, जाणीव देतो एकटेपणाची. ...

बदला नको,मज बदल हवा...

Image
बदला नको,मज बदल हवा...  नव आशा अन नवदिशा, ध्यास मज हा उषा अन निशा. जात-पात,भेदभाव टाळूया, नवसमाज निर्माण करूया. मानवतेचे बीज रोवूनी, आपुलकीच्या वटवृक्षाला घालू प्रेमाचे खत पाणी. ना माझे,ना तुझे असे जिथे, गुण्यागोविंदाने राहू तिथे. विश्व आपुले घरकुल, उभारू असे संकुल. आदर्श घेऊ महामानवांचा, वारसा उभारू विचारांचा. कृतीत घालून विचार चांगले, परिवर्तनाचे बांधू पक्के इमले. संघर्षाचा मार्ग आपला, लढा नवा हा जरी मानला. तरी तो पुरातन आहे, परी,वाट नवी अन ध्यास नवा, बदलाची वाट काळ पाहे. बल असोनी अशक्त का रे ?  वर्ग होवूनी विखुरले सारे. एकसंध होवूनी सशक्त बनूया, मानवतेचे गीत गाऊया. नसे भेद जिथे सकळा, श्वास हवेत त्या घेवू मोकळा. बदला नको,मज बदल हवा.  प्राची दुधाने  वारसा फाऊंडेशन