Posts

Showing posts from April, 2024

ज्योतिबा

Image
आज ११ एप्रिल,  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती/जन्मोत्सव 🙏🚩   ज्योतिबा आज तुम्ही समोर असता तर प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी  व्यक्त झाले असते. तरी, आपल्याला स्मरून व्यक्त होते.    दिवसागणिक ज्योतिबा तुमचे विचार व कार्य मेंदू आणिक मनात दृढ होत आहेत. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा दाखवून प्रगतीच्या पथावर घेवून येण्याचे अशक्य प्रयत्न आपण पूर्वत्वाला घेवून गेलात. आता त्यातून तुमचे पाईक म्हणून अनेकांनी आपले सवते सुभे मांडले आहेत. आम्ही कसे फुल्यांचे वैचारिक वारस आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असं असलं तरी तुमचे विचार मात्र त्यांच्या कृतीतून केव्हाच हद्दपार झाले आहेत.    ज्योतिबा तुम्ही आम्हा बहुजन वंचितांना बोटाला धरून शाळेत घेवून गेलात. अक्षर ओळख शिकता शिकता कधी मानव म्हणून आमची ओळख होवू लागली समजलंच नाही. थोडी बहुत समाजात आमची विचारणा होवू लागली. घराचा उंबरठा ओलांडून गगनभरारी घेवू लागलों. ज्योतिबा तुम्ही तुमच्या सावित्रीबरोबर कोट्यवधी सावित्रीच्या लेकींचे अस्तित्व निर्माण केले.  खोट्या व अनावश्यक रूढी परंपरेच्या भया...

छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन

Image
ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने नवा इतिहास रचला. गुलामीत खितपत पडलेल्या, जीवनात शोषणचं वाट्याला आलेल्या बहुजनांना आपले स्वतःचे राज्य-रयतेचे राज्य, म्हणजेच स्वराज्य हे संघर्षातून निर्माण केले व बहाल केलं. असे स्वराज्य निर्माते, अद्वितीय व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज.    स्वराज्य मिळवण्यासाठी जो संघर्ष, जे बलिदान जिवंतपणी शिवरायांना द्यावे लागले, तेच स्वप्न त्यांच्या मृत्यूचे ही कारक बनले. आपल्या या राजाच्या कर्तृत्वशाली इतिहासात अनेक शूरवीर, वीरांगना, अठरापगड जाती, बारा बलुतेदार सर्व मावळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होते. म्हणूनच हा राजा रयतेचा राजा होता आणि राहिलं.    परंतु, खेदाची बाब की, राज्याच्या अस्तनींत स्वराज्यद्रोही, घातकी, फितूर, द्वेषी, कटकारस्थानी बांडगुळ भट आणि स्वकीय निखारे होते. त्यांनी अचूक वेळ साधली आणि घात केला. स्वराज्य पोरकं झालं.  आजचाच तो काळा दिवस. इतिहासाच्या पानातील हृदय पिळवटून टाकणारी, कधी ही कानी पडू नये अशी घटना.  ज्याच्या जीवनाची गाथा वाचून नियती ही ढाय मोकलून रडली असेल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला ...