मंथन
मंथन कोणी ही कोणत्या ही स्त्री बाबत आक्षेपाहार्य विधान करण्यावर माझा नेहमीच विरोध असतो. याचा अर्थ कोणी टीकाच करू नये असं नाही. परंतु, आपल्या भाषेचा वापर आपले संस्कार दर्शवतं असतात हे तितकंच महत्वाचे. अनेकांना मी स्त्रीवादी वगेरे वाटते. अर्थात स्त्रीवादी असणं किंवा कोणी तसं आपल्याला म्हणणं अजिबात चुकीचं वाटत नाही. हो पण मी एकांगी स्त्रीवादी निश्चितच नाही ! ते baised म्हणतात ना, म्हणजे पक्षपाती वगेरे मी नाही. मी पूर्वग्रहदूषित तर अजिबात नाही. म्हणून जिथे जे व ज्याचे चूक त्याला विरोधच असतो. तसंच, स्त्रियांच्या बाबत ही काही सत्य आपण स्त्रियांनी स्वीकारायला पाहिजे. पुरुषीसत्ता आपण किती वाहून घ्यायची याची मर्यादा आपल्याला कधी समजलीच नाही. आपली प्रत्येक बाब या पुरुषांवर अवलंबून ठेवायची. का? असा प्रश्न कधी आपल्याला सतावत नाही का? जगात एकटं कोणी काहीच करतं नाही. माणूस म्हंटल की एकमेकांची मदत, आधार वगेरे असतोतच. किंबहुना ते असावंच. परंतु, त्यासाठी किती झुकतं माप घ्यावं, याला मर्यादा का नसावी? पण इथे पण बघाना लिहिताना "माणूस" असं लिहिलं आहे मी. माणूस हा पुरुष लिंगीच शब्द आहे ना? मग इथ...