रक्षाबंधन
माझे,माझ्या कुटुंबियांचे,समाजाचे, राष्ट्राचे,मानवतेचे या वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या सर्व भगिनी व बांधव यांना रक्षाबंधनाच्या शिवमय शुभेच्छा ! रक्षाबंधन हा केवळ बहीण-भाऊ यांचे नातं दर्शवणारा सण का असावा? प्रत्येक नात्यातील निर्माण होणारा विश्वास दृढ करणारा हा सण का नसावा? त्या अनुषंगाने आपण सर्वांनी हा सण साजरा का करू नये ?.. लिंग भेद,स्त्री पुरुष समानता-असमानता यासारखे विषय या व अशा असंख्य अनावश्यक रूढी,परंपरा व संस्कृतीच्या नावाखाली पिढ्यानंपिढ्या साजरे होणाऱ्या सणांना आपणच जाणते-अजाणतेपणे खतपाणी घालत आहोत.बहिणीचं रक्षण करणारा भाऊ असतो..हे विचार आपण लहानपणापासुन मुलांवर बिंबवत रहातो. म्हणजेच,स्त्री/मुलगी ही स्वतःच रक्षण करण्यास असक्षम आहे हे शिकवायचं आणि तिने आयुष्यभर आवलंबून रहायचं..तसंच मुलाने आयुष्यभर जबाबदारीच्या ओझ्याखाली रहायचं,आपण पुरुष आहोत आणि स्त्रीचे रक्षणकर्ता आपणच या भ्रमात आयुष्य जगायचं. खोट्या आणि चुकीच्या रूढींमुळे ना स्त्री मुक्त आयुष्य जगू शकते ना पुरुष ! स्त्री सतत परावलंबी व पुरुष सदैव वर्चस्ववादी,पण दोघे ही संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेले..मग नातं कोणत...