महाराष्ट्र दिन
१मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आजच्या दिवशी १९६० साली स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.पण या मागचा इतिहास फार संघर्षाचा आहे.राज्य पुनर्रचना आयोगाने त्यावेळी (१९५६)महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाने क्रोधित झाला होता.अनेक ठिकाणी,विविध पद्धतीने सरकार विरोधात निषेध व्यक्त केला जात होता.संगठीत कामगारांचा असाच एक भव्य मोर्चा २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात जमला होता. सरकार विरुद्ध घोषणा व निषेध व्यक्त होत होते. पोलीसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकला जात होता.आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. एवढं होऊन देखील कामगारांचा मोर्चा आपल्या भूमिकेवर अटळ होता.महाराष्ट्र द्वेषी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश पोलिसांना दिला.यातच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांचे या मातीत रक्त सांडले. या घटनेच्या साडेतीन वर्षानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.पण,त्यासाठी १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे ल...