गुरु पौर्णिमा
गुरु पौर्णिमा गुरु..शब्द छोटा असला तरी,या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे.जो आपल्याला त्यांनी संपादन केलेले सर्व ज्ञान त्याबदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवता दान करतो आणि अज्ञानाकडून ज्ञानाचा मार्ग दाखवतो तोच खरा गुरु जाणावा.चुकीचे ज्ञान देणारी व्यक्ती गुरु असूच शकत नाही.पण,चुकीचे कर्म करून तुम्हाचा सतत छळ करणारी व्यक्ती देखील तुमचा गुरु असू शकते हे मान्य करण्यास हरकत नाही.इथे,जर त्यांच्या चुकीच्या कृतीला तुम्ही विरोध केलात,बंड पुकारलात,विद्रोह केलात, सकारात्मकतेकडे एक पाऊल टाकलं,आपल्यात शुद्ध परिवर्तन केलंत तरचं आपण त्या कुव्यक्तीला गुरु म्हणू शकतो.खरं तर इथे आपणच आपले गुरु होत असतो,कारण वाईट ओळखून त्याला विरोध करणं हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.असे असले तरी माझ्या मते आपल्याला कमीपणा आणणारे,अपमानित करणारे,आपल्याशी विनाकारण स्पर्धा करणारे,इत्यादी सर्व आपले गुरु होवू शकतात.बरं हे कोणी ही असू शकतात.ओळखी-अनोळखी,आप्तेष्ठ, मित्र-शत्रू,कोणी ही.हे आपले आदर्श गुरु असतात.हे आपल्याला आयुष्यात काय करू नये हा धडा देतात, त्याचबरोबर अनन्यसाधारण असे काही करून दाखवण्याचे बळ आपल्यात निर्माण करतात....