Posts

Showing posts from April, 2022

१ मे महाराष्ट्र दिन

Image
१ मे महाराष्ट्र दिन ! लेख गेल्या वर्षीचाच आहे.त्यात दोन चार वाक्य महाराष्ट्राची आजची स्थिती दर्शवणारे जोडले आहेत. परंतु आशयातील गाभा मात्र बदललेला नाही.आज ही महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.तो प्रयत्न रोखला पाहिजे.का? त्यासाठी हा लेख आवर्जून वाचा. १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. आजच्या दिवशी १९६० साली स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली होती.पण या मागचा इतिहास फार संघर्षाचा आहे.राज्य पुनर्रचना आयोगाने त्यावेळी (१९५६)महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले.महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक मराठी माणूस या निर्णयाने क्रोधित झाला होता.अनेक ठिकाणी,विविध पद्धतीने सरकार विरोधात निषेध व्यक्त केला जात होता.संगठीत  कामगारांचा असाच एक भव्य मोर्चा २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन परिसरात जमला होता. सरकार विरुद्ध घोषणा व निषेध व्यक्त होत होते. पोलीसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव टाकला जात होता.आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. एवढं होऊन देखील कामगारांचा मोर्चा आपल्या भूमिकेवर अटळ होता.महाराष्ट्र द्वेषी तात्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई या...

चालू राज_कारण !

एक नेता म्हणतो आपला धर्म घरात ठेवा आणि स्वतः मात्र मस्जिदी पुढं स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करायला सांगतो.. दुसरे दोन येतात आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर परवानगी नसताना हनुमान चालीसा पठण करणारं म्हणतात..  तिसरं टरबूज येत आणि स्वतः ही हनुमान चालीसा म्हणतं माझ्याकडे सगळ्यांनी येऊन चालीसा म्हणा काही हरकत नाही असं ही म्हणतं.. या सर्वात काही गोष्टी कॉमन आहेत.त्या कोणत्या?  १) हे सगळे राजकारणी आहे.  २) सत्तेच्या बाहेर आहेत.  ३) सगळे धर्मांध आहेत. ४) सगळ्यांनी हुमान चालीसा हत्यारं बनवलं आहे. ५) कायदा सुव्यवस्था अस्थिर करण्याचं काम करत          आहेत. ६) यांचा बोलविता धनी,मास्टरमाइंड एकच आहे. ७) सगळे जनतेची दिशाभूल करत आहेत. ८) देव,धर्म,जात यांचं राजकारण करून समाज अधिक      अंधविश्वासाकडे आणि विषमतेकडे घेवून जात आहेत.  ९) सोयीनं स्वतःच्या मतलबा खातर संविधानाचा       गैरवापर करत आहेत. १०) बहुजनांची माथी भडकवून आपला स्वार्थ साधत         आहेत. ११) हे सगळं करून महत्वाच...

कन्यादान या विधीच्या निमित्ताने..

Image
कन्यादान या विधीच्या निमित्ताने.. हजारो वर्षाच्या भारतातील अनेक कालबाह्य होत असलेल्या धर्म,संस्कृतीच्या नावाखाली चालवलेल्या अनावश्यक रूढी परंपरा यांचे खंडन करून भारतीय समाज हा सातत्याने परिवर्तन करत आला आहे. आज ही अनेक अशा अनावश्यक रूढी परंपरा समाजामध्ये रूढ असल्याचे चित्र दिसून येत आहे.  सोयीप्रमाणे अनेक बदल आपण यात केले असले तरी विषमतावादी अनेक रूढी आपण कवटाळून आहोत हे सत्य स्वीकारणं अनेकांना अवघड जात आहे.एकीकडे स्त्री पुरुष समानतेचे शाब्दिक/मौखिक गोडवे गायचे आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांना संकोचित,अपमानित, लज्जास्पद,कमीपणा इत्यादी नकारात्मक परिस्थिती निर्माण होईल अशा पारंपारिक रूढी धर्माचे,संस्कृतीचे भूषण म्हणून मिरवायचे.ते ही स्त्री जन्मापूर्वी पासून ते मृत्यू नंतर देखील.हा दुटप्पीपणा कळत नकळत समाजामध्ये आज ही प्रचिलित आहे.बऱ्याच औंशी यात बदल होत आहे.तरी यावर अधिक चिकित्सा होणं आवश्यक आहे.हे जवळ पास सगळ्याच धर्मात होत आहे.परंतु मी हिंदू/सनातनी धर्म या विषयीच इथे मांडणी करणारं आहे.कारणं माझ्यासाठी तस करणं म्हणजे आधी आपल्या घरातील केर बाहेर काढणं आहे.याची प्रेरणा इतर समाज बांधव भग...

गुढी पाडवा चिकित्सा

Image
गुढी पाडवा चिकित्सा  आपण गुढी पाडवा का ? कधी व कसा साजर करतो ? हे प्रमुख तीन प्रश्न उपस्थित रहातात.   भारतीय मूळ सण हे निसर्ग,शेती(कृषि)या वर आधारित असतात.तसाच पाडवा हा सण म्हणून का साजर करतात ? याकडे जर या दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. → चैत्र महिन्यात वसंत ऋतु शुरू होतो.आधीच्या शिषीर  ऋतुमधे झाडांची पानगळ झालेली असते. वसंत ऋतु मधे झाडांना नवी पालवी फुटते.याला चैत्र पालवी म्हणतात.आंब्याला मोहर येतो,विविध फुल झाड बहरतात.हा नैसर्गिक बदल सर्व सजीवांसाठी आल्हाददायी भसतो.नवनिर्मितीची प्रक्रिया हा निसर्ग नियम आहे.मानवासाठी हा बदल नव चैतन्य घेवून येतो.निसर्गाप्रति कृतज्ञ भाव या सण,उत्सवातून दिसणं अपेक्षित आहे.यामध्ये निसर्ग पुजन आलं.आपण कृषक वंशीय आहोत.निसर्गाचा ऱ्हास करून निसर्गा प्रती आदरभाव म्हणजे दोगलेपणा होय.आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या मूळ परंपरांना आपण मूठ माती देत भेसळ झालेले सण आनंदोत्सव म्हणून साजरा करत आहोत.गोड धोड पदार्थ करणं आनंदोत्सवाचाच भाग.कडूलिंबाचापाला दाहकता कमी करण्यासाठी नेहमीच उपयोगी असतो.पण इतर कोणती ही अनावश्यक अतिशयोक्ती निरर्थकच.आता आ...