चालू राज_कारण !
एक नेता म्हणतो आपला धर्म घरात ठेवा आणि स्वतः मात्र मस्जिदी पुढं स्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करायला सांगतो..
दुसरे दोन येतात आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर परवानगी नसताना हनुमान चालीसा पठण करणारं म्हणतात..
तिसरं टरबूज येत आणि स्वतः ही हनुमान चालीसा म्हणतं माझ्याकडे सगळ्यांनी येऊन चालीसा म्हणा काही हरकत नाही असं ही म्हणतं..
या सर्वात काही गोष्टी कॉमन आहेत.त्या कोणत्या?
१) हे सगळे राजकारणी आहे.
२) सत्तेच्या बाहेर आहेत.
३) सगळे धर्मांध आहेत.
४) सगळ्यांनी हुमान चालीसा हत्यारं बनवलं आहे.
५) कायदा सुव्यवस्था अस्थिर करण्याचं काम करत
आहेत.
६) यांचा बोलविता धनी,मास्टरमाइंड एकच आहे.
७) सगळे जनतेची दिशाभूल करत आहेत.
८) देव,धर्म,जात यांचं राजकारण करून समाज अधिक
अंधविश्वासाकडे आणि विषमतेकडे घेवून जात आहेत.
९) सोयीनं स्वतःच्या मतलबा खातर संविधानाचा
गैरवापर करत आहेत.
१०) बहुजनांची माथी भडकवून आपला स्वार्थ साधत
आहेत.
११) हे सगळं करून महत्वाचे जे विषय आहेत जसे की
महागाई,शेती,शिक्षण,आरोग्य,बेरोजगारी,महिला
सुरक्षा,इत्यादी विषयांना फाटा देवून जनतेमधे द्वेष
पसरवत आहेत.
यात एक मात्र समाधान आहे.जनता अधिक सुज्ञ होत आहे.यावर अधिक प्रतिक्रिया देत नाही.परंतु यांचे प्रयत्न वाढत रहातील.आपण मात्र तटस्थ रहायचं.यांचे फोडा आणि राज्य करा हे तंत्र आता यशस्वी होवू देवू नका.
धर्माच्या,जातीच्या,देवाच्या नावावर हे तुमचा वापर करतात.आपण आपला देव,धर्म,जात सगळं घरात ठेवू.
समाजात मानवता आणि माणुसकी प्रस्थापित करू.
काळजी घ्या ! जागृत व्हा..
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment