Posts

Showing posts from January, 2022

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??

Image
आज ३० जानेवारी २०२२. मोहनदास करमचंद गांधी,म्हणजे भारताचे बापू, महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन.असंख्य प्रकारे आज त्यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी व मलीन करण्यासाठी प्रयत्न केले जातील,यात दुमत नाही. "माणूस मेला,की वैर संपत",म्हणणारे  आज स्वतःचं गांधी हत्येच समर्थन करताना दिसतील व आपल्या विचारात गांधींना नथू बनून पुन्हा गोळ्या घालून कुटील हस्य चेहऱ्यावर दाखवतील.७० वर्षात इतकं धाडस निर्माण झालय,ते काय थोडय.. असो ! मी मात्र माझ्या कुवतीप्रमाणे (अर्थात् वैचारिक कुवत)इथ हा लेख प्रस्तुत करत आहे.याचं शीर्षक थोड हटके आहे.पण,संपूर्ण लेख आवर्जून  वाचा हि विनंती आहे.उगाच अर्धवट तर्क वितर्क नकोत.मगच त्यातील विचार स्पष्ट होतील.तर चला सुरुवात करूया.. "बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"?? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  भारताला स्वातंत्र्य मिळून त्याची पंच्चहत्तरावी आपण २०२१-२२ मधे धूम धडाक्यात जगभर साजरी करत आहोत.देशाच्या स्वतंत्र्यं लढ्यात असंख्य भारतीयांनी आपल्या प्राणांची आहूती दिली,अनेकांनी शेवटच्या श्वासा पर्यंत स्वतंत्र्याचा नारा दिला,आपलं संपूर्ण जीवन भारतीयांनी येण...