"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??

आज ३० जानेवारी २०२२.
मोहनदास करमचंद गांधी,म्हणजे भारताचे बापू,
महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन.असंख्य प्रकारे आज त्यांच्या स्मृतिला उजाळा देण्यासाठी व मलीन करण्यासाठी प्रयत्न केले जातील,यात दुमत नाही.
"माणूस मेला,की वैर संपत",म्हणणारे  आज स्वतःचं गांधी हत्येच समर्थन करताना दिसतील व आपल्या विचारात गांधींना नथू बनून पुन्हा गोळ्या घालून कुटील हस्य चेहऱ्यावर दाखवतील.७० वर्षात इतकं धाडस निर्माण झालय,ते काय थोडय..
असो ! मी मात्र माझ्या कुवतीप्रमाणे (अर्थात् वैचारिक कुवत)इथ हा लेख प्रस्तुत करत आहे.याचं शीर्षक थोड हटके आहे.पण,संपूर्ण लेख आवर्जून  वाचा हि विनंती आहे.उगाच अर्धवट तर्क वितर्क नकोत.मगच त्यातील विचार स्पष्ट होतील.तर चला सुरुवात करूया..

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

भारताला स्वातंत्र्य मिळून त्याची पंच्चहत्तरावी आपण २०२१-२२ मधे धूम धडाक्यात जगभर साजरी करत आहोत.देशाच्या स्वतंत्र्यं लढ्यात असंख्य भारतीयांनी आपल्या प्राणांची आहूती दिली,अनेकांनी शेवटच्या श्वासा पर्यंत स्वतंत्र्याचा नारा दिला,आपलं संपूर्ण जीवन भारतीयांनी येणाऱ्या पिढ्यांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून संघर्ष उभा केला.या सगळ्यात मोहनदास करमचंद गांधी,हे नाव घेतल्या शिवाय हा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होवू शकत नाही,हे मात्र सत्य आहे. अनेकांचे यावर नकारार्थी मत व भूमिका आहेत.
पण जगाच्या पाठीवर कुठे ही गेले तरी हा भारत बुद्धांचा,गांधींचा आहे हे सांगण्याशिवाय मात्र त्यांना गत्यंतर नाही.कारण मूठभर लोकांनी गांधीचे स्वतंत्र्य लढ्यातील योगदान नाकारले,म्हणजे ते सत्य आहेत
असे होत नाही.गांधीजींबाबत अनेक मतभेद निर्माण झाले.त्यांनी देशाचे दोन तुकडे केले,पाकिस्तानला ५० कोटी देण्याचा आग्रह धरला,वगेरे,वगेरे.एवढचं काय तर भगतसिंगांपासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादिंच्या ते विरोधात होते,अनेक नेत्यांना काँग्रेसमधे डावलण्याचे काम गांधींकडून झाले.अशा चर्चा ही होत असतात.
आणखीन बदनाम करण्याच्या हेतू पर,गांधी कसे स्त्रीलंपट होते हे देखील मांडण्यात त्यांचे विरोधी कमी पडले नाहीत.म्हणजे एकंदरीत काय,तर
"बापू देश की सेहत के लिए तू तो हानिकारक है।"
असे पटवून देण्यात संघी मानसिकता नहेमीच आग्रेसर राहिली आहे.याचा अंत काय तर नथुराम गोडसे सारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून गांधींची हत्या करण्यात आली.
      आज जवळपास ७४ वर्षे झाली या देशात या विवृत मानसिकतेतून रोज गांधी मारले जातात.कुठे प्रतिकात्मक,तर कुठे प्रत्यक्ष महात्मा असणाऱ्या व्यक्तींना गोळ्या घालणं आज ही सुरूच आहे.गोडसे सारख्या विखारी व द्वेषाने भरलेल्या व्यक्तीचं उदात्तीकरण केले जात.त्याला पंडित म्हणून त्यांच्या प्रतिमा व मंदिर उभी केली जाताहेत.इतिहास बदलण्याच्या खुणा असंख्य माध्यमातून सुरूच आहेत.यात कमी अधिक भर म्हणून की काय,स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या व संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून देखील गोडसे मानसिकतेच उदात्तीकरण व गांधींना खलनायक दाखवण्यासाठी चित्रपटाचा आधार घेतला जातो.
    गेल्या ७ ते ८ वर्षात देश खूप बदलला आहे.
सुप्त असलेली अनावश्यक द्वेषाची व भेदाभेदाची भावना उफळून चौकाचौकात नंगानाच करू पहाते.सातत्याने खोटा,चूकीचा इतिहास मांडून देशहितासाठी झटलेल्या महानायक महानायिकांना बदनाम केलं जातयं.स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात,लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे घेवून जाण्याचे रोज मनसूबे आखल्या जात आहेत.यासाठी सर्वप्रथम प्रयत्न होतात ते देशाची एकात्मता
भंग करण्यासाठी.त्याकरिता इतिहासाचा आधार घेतला जातो.आपल्याला अभिप्रेत असणारा इतिहास केंद्र शासित संघी,भाजपी मनुवृत्त्ती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी वट्टेल ते प्रयत्न करत आहेत.
कधी गांधींना,तर कधी नेहरूंना बदनाम करत आहेत. कधी पटेलांना,तर कधी सुभाष बाबूंना आणि वेळ पडल्यास बाबासाहेबांना ही आपलं म्हणत आहेत. भगतसिंगांना तर गांधींचे वैरीचं सांगून,हे नसते धीट मोकळे झाले आहेत.वैचारिक मतभेदातरोबर मनभेद निर्माण करण्यात हे अनेकदा यशस्वी होतात.आज ही काही प्रमाणात ते यशस्वी आहेतच.तरुण पिढी,जी आपल्या सत्य इतिहापासून कोसोदूर ठेवल्या गेली आहे,ती गांधींना खलनायकचं समजत आहेत.हो,पण इतिहास वाचून चिकित्सा करणारी तरुणाई हे विखारी मनसूबे हानून पाडण्याचा प्रयत्न देखील जोरदारपणे करत आहे.पण,नव्या देशप्रेमाच्या व्याख्येत ते बसत नाहीत बरं का ! हे विशेषच..
    प्रचंड जनसामुदाय स्वातंत्र्य लढ्यात भारतातमधे उभं करण्याचं सामर्थ्य गांधींमधे होते.त्यांनी ते करून ही दाखवलं.यात महिलांचा सहभाग पहिल्यांदा मोठ्याप्रमाणात होता. हे आपण विसरतो.आपल्या अहिंसक तत्वांवर गांधी नेहमी ठाम होते.द्वेषापायी  कोणाचा जीव घ्यावं हा विचार तर सोडाच,पण साधी चापट ही कोणाला मारु नये.हे गांधींचे विचार होते.
"कोणी आपल्याला गालात मारली,तर दुसरा गाल पुढं करा",म्हणणारे गांधी अनेकांना नेभळट वाटतात.पण तो त्यांचा विचार होता.तुम्ही त्याच अनुकरण करा,अशी सक्ती त्यांनी केली नाही.मला नेहमी वाटत हा देश व त्यावर वैचारिक छाप जितकी गांधींच्या अहिंसेची आहे. तितकीच समकालीन बोस,आजाद,भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतीकारी विचारांची देखील आहे.
पण,या सगळ्यात आपण या सर्वांचे एक विचार,
ज्यावर ते सर्व सहमत होते ते मात्र लक्षात घ्यायला हवे.
ते म्हणजे विनाकारणचा रक्तपात यांना कोणालाच अभिप्रेत नव्हता.हे तितकच सत्य आहे.अहिंसेच्या विरुद्ध विचार म्हणजे,अनावश्यक हिंसाचं असते असं नाही. शेवटी काय,तर देशाला स्वातंत्र्य मिळावं ही भूमिका या प्रत्येकाची होती व त्यावर त्यांनी आपआपल्या पद्धतीने वैचारिक कृतिशील अंमल ही केला.
   पण,या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी काडीचे ही योगदान केले नाही,त्यांनी या महामानवांच्या कार्यावर कायम मुक्तसुमने मात्र उधळली.हे कितपत योग्य आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न.. 
    तुम्ही केवळ तुमच्या मानसिक स्थिरतेमुळे,म्हणजे ज्यात वैचारिक प्रवाहाची,हलचालींची (कृतिचा)आभाव आहे.या कारणाने तुम्ही एका महान व्यक्तीची नींदा करता.पण,अशा व्यक्ती तुमच्या नींदेच्या पलीकडे केव्हाच पोचलेल्या असतात.त्यांनी मानव व समाजहिताचे अभिप्रेत कार्य या भूमीत केव्हाच रुजवलं आहे.केवळ तुम्हाला पटत नाही,म्हणून दूषने देवून,त्यांची प्रतिमा
डागाळण्याचा,त्यांची हत्या करून त्यांचे विचार खुंटवण्याचा केवीलवाणा प्रयत्न का व कितीदा करणार ?
    माणसं मरतात,मारली जातात.पण,त्यांचे विचार मात्र दिर्घकाळ टिकतात.हे वास्तव असताना हा द्वेषयुक्त सातत्याने केलेला प्रयत्न हे प्रगल्भ,पुरोगामी विचार संपवण्याचा साफ हेतु स्पष्ट करत असताना. आपल्यासारखे पुरोगामी,मानवतावादी विचार व कृति असणाऱ्या व्यक्तीनी अबोल रहाणं,म्हणजे या विकृत मानसिकतेला मुक संमती देण्यासारखे नाही का? 
  आज असंख्य अंबेडकरी विचारधारा जोपासणारे बांधव-भागिनी गांधींचे वैचारिक मनभेद असले तरी,गोडसेची भूमीका धुकवावून लावताना दिसतात.
ही माझ्या दृष्टीने स्वागतहार्य बाब निश्चित आहे.हा देश गांधींच्या विचारावर पूर्णपणे चालावा का ? असा प्रश्न निश्चितच पुन्हा विचार करण्यासारखा आहेच.पण तो गोडसेच्या मानसिकतेवर असणं,म्हणजे नभरून येणारं नुकसान ठरेल यात शंका नाही.
  एखाद्याच्या हजार सकारात्मक बाबींना लाथाडून,कथा कथित गोष्टी समोर ठेवून,बिनबुडाचे आरोप करून, निहत्या वयोवृद्ध व्यक्तीला जर गोडसे आपली ओळख पूर्णपणे बदलून मारू शकतो.तर विचार करा ही किती घातक विचारसरणी आहे.
  एका हिंदूने गांधींना मारलं ही बोंब उठवावी लगते.प्रत्यक्षात मात्र तो ब्राह्मन.जो पूर्णपणे धर्म बदलून गांधींना मारतो.जे ब्राह्मन स्वतःला हिंदूच मानत नाहीत,ते आपली प्रतिमा साफ ठेवण्यासाठी त्या हिंदुत्वाचा आधार घेताना दिसतात.ते हे नेहमीच करतात.पण,इथे हा विचार आपल्याला करायचा आहे,की गांधी कोण होते ? गांधी हे हिंदूच होते.अगदी मरताना सुद्धा,"हे राम" म्हणणारे गांधी देशाने पाहिले.ज्या रामाचे उदात्तीकरण संघी  करतात, त्यालाच मानणाऱ्या गांधींना मात्र ते निसंकोचपणे गोळ्या घालून मारतात ! बघा,यांचे हिंदू,हिंदूत्व,राम वगेरे किती पोकळ होते व आहेत.गांधींना मुस्लीम धार्जिण्या म्हणणाऱ्यांनी,का बरं धर्म बदलून त्यांची हत्या करण्याचा कट रचला ? हे जग जाहीर आहेच.धार्मिक तेढ निर्माण व्हावा म्हणून.मुळात यांना विरोध गांधीचा नसून त्यांच्या सर्वसमावेशक विचारांचा होता.देशाची फाळणी होवू नये,या विचारांचे गांधी होते.पण संघ्यांना अखंड भारत/ हिंदुस्थान वगैरेची दिवसा गोड स्वप्न पहाण्याची लत लागली होती.ति लत आज ही पूर्ण करण्याचे प्रयत्न ते करत आहेत.या त्यांच्या सर्व विचारांना गांधी बाधक होते व आहेत.हेचं सत्य.
    काही दिढ शहाणे आपल्या अकलीप्रमाणे असंख्य प्रश्न झाडतात.गांधींनी का देशाची फाळणी रोखली नाही ? देशाचे तुकडे त्यांनीच केले.का ? फाळणी वेळी गांधी काय करत होते ? वगैरे...मुळात गांधींनी प्रयत्न केले नाहीत असं नाही.पण,ते यशस्वी झाले नाहीत.कारण इथे फक्त गांधींचेच मत विचारात घेतलं जात होत असं नाही. गांधींच्या विचाराला विरोध तेव्हा ही मोठ्याप्रमाणात होतच.याच रुपांतर काही मूठभर विरोधी लोकांच्या स्वार्थापायी फाळणी झाली,अस म्हणणं वावगं होणार नाही.म्हणजे फाळनी गांधीनी केली असं होत नाही. राहिला प्रश्न गांधी फाळणी वेळी काय करत होते ? तर इतिहास सांगतो तेव्हा गांधी कलकत्यामधे या फळणीमुळे निर्माण होणारी हिंसा मिटवण्यात व्यस्थ होते.मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवात गांधींनी सहभागी होण्यास नकार दिला होता.कारण,देशाची अवस्था पाहून, अनावश्यक रक्तपात डोळ्यादेखत होताना पाहून ते अस्वस्थ होते.त्यांना हे होणे निश्चितचं अभिप्रेत नव्हते.
हे यावरून आपण निश्चितच समजू शकतो.
    गांधी या वेळेस म्हणाले होते,
"मी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करू शकत नाही.पण तुम्हाला तो करू नका अस मी म्हणणार नाही.
मी तुम्हाला रोखणार नाही.पण,दुर्दैवाने जे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे,त्यात भारत व पाकिस्तामधे कायमस्वरूपी वादाची बीजं आहेत.मग आपण दिवे कसे पेटवू शकतो".त्यांच्यासाठी हिंदू व मुस्लीम यांच्यात शांतता त्यांना अधिक गरजेची वाटत होती.हे विचार गांधीचे होते.म्हणून ते लगेचे चुकीचे अथवा खलनायक होत नाहीत.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात जात,पात,धर्म,
लिंगा,उच्चता,निचता असले सगळे भेद समोर ठेवून हा संघर्ष सर नव्हता केला.यात सर्वांचा मोलाचा सहभाग होताच.नव्हता फक्त संघाचा.ते ब्रिटिश धार्जिणे होते.सतरा वेळा माफीनामे लिहून,पदरात माफीची भीक 
पाडून घेवून,जिवंत असेपर्यंत ब्रिटिशांच्या पेंशनीवर जगणारे महाभाग,गोडसेसारखा चेला तयार करून,गांधी हत्या घडवून आणतात.आज यांचे चेले चपाटे यांचे उदात्तीकरण करून यांना स्वातंत्र्यवीर,पंडीत अशा स्वयंघोषित उपाध्या देवून मोकळ होतात.वर गांधींना महात्मा म्हणण्यास व मानण्यास नकार देतात.ज्या सुभाषचंद्र बोसांचे स्वार्थासाठी हे संघी आजकाल गोडवे गातात.त्याच सुभाष बाबुंनी गांधींना"महात्मा"ही उपाधी दिली असल्याचे मात्र ते डावलतात.
   यांची हीच दुटप्पी खेळी आता देशातील तरुण नरुणींनी ओळखायला हवी. तरुण-तरुणीच का ? कारण साठी पार केलेल्या लोकसंखेत आता फार काही बदल होणं अपेक्षित नाही.कारण तसा भारताचा इतिहास ते जाणतात.पण,फार बोलतं नाहीत.
तरुण तरुणी हे देशाचं भवितव्य असतात.त्यांना चुकीचं फिडिंग केल की देश सहन काबीज़ करता येतो.
हे विकृत मनोवृत्तीला माहित आहे.म्हणून तर इथे मोफत शिक्षण मिळत नाही,पण फ्री WIFI जरूर मिळतो. कारण,ही युद्धाची नवी पद्धत आहे.देशाच्या,जगाच्या एका कोपऱ्यात बसून हे तुमच्या घरापर्यंत पोहचू शकतात.अगदी सतत खोटे पेरून तुम्हाला मानसिक गुलाम बनवण्याचा प्रयत्न क्षणोक्षणी केला जात आहे. तुम्हाला आपल्या नाकरतेपणाच खप्पर,ते दुसऱ्यावर फोडताना दिसतील.सतत गांधी-नेहरु द्वेष
पसरवला जातो.क्राँग्रेसने ६०-७० वर्षात काय केलं? 
असे प्रश्न तुमच्यासमोर फेकले जातात.त्यावर काही गमतीशीर मिम्स पण बनवतातं.आपण मात्र अविचाराने हे सगळं बधिरपणे फॉरवर्ड करत रहातो आणि गांधीना पुन्हा पुन्हा मारत असतो.मग ज्यांनी प्रत्यक्षपणे एका व्यक्तीचा खून केला,त्यांची खिल्ली उडवून आपण या गुन्ह्याला समर्थन तर देत नाही ना ?
हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा..
    मी आता जवळपास माझी चाळीशी गाठण्याच्या मार्गावर आहे.आमच्या लहानपणी हे गांधी विरोधी विचार अस्तित्वात होतेचं.मी ही छान खिल्ली गांधींची उडवलेली मला आठवते.पण ते कळण्याचं वय नव्हत. लहानपण,तरुणपण असच सरलं.आज मागे वळून पहाताना आपण चूकलो.याची जाणिव होते. माझ्यासारखे असंख्य आहेत.हे ही हळूहळू समजतंय.
असं वाटतं,जर हे द्वेषाने,मत्सराने भरलेल्या विचारांना अपल्यात स्थान दिल नसतं,जर गांधींची खिल्ली उडवली नसती,जर त्यांना खलनायक समजलो नसतो,तर या संघी  मनोविकृतीला इतकं बळ मिळाल नसतं आणि याच विकृत मानसिकतेतून दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी,गौरी लंकेश सारख्या पुरोगामी,मानवहिताचे कृतिशील विचार मांडणारी माणस आज जिवंत असती.पण,मनावर हे ओझ घेवून मी तरी जगणार नाही.भूतकाळात नकळतपणे झालेल्या चुका सुधारण्याची संधी मला मिळाली आहे.त्यासाठी मला लिहीलं पाहिजे,बोललं पाहिजे,जागृती निर्माण करायला हवी.
Mental Stagnation,म्हणजे मानसिक स्थिरता असणारे ते आज ही समजू शकणार नाहीत.पण,मी या मानसिक स्थिरतेतून कायमची प्रगतिकडे वाटचाल सुरू केली आहे.मेंदूचा दुर्गंधीत डोह होवू देवू नका. महासागराच स्वरूप त्याला येवूद्या.तेव्हा गांधी तुम्हाला कदाचित थोडे तरी उमगतील.     
     गांधींच उदात्तीकरण केलंच पाहिजे असं नाही. पण,त्यांना खालीपणा देताना आपण कोणाला उठाव देतोय हे अधिक महत्वाचं आहे.कारण बापू त्यांनाचं खटकतात ज्यांना ते अडथळा वाटतात आणि
"बापू देशाच्या सेहतसाठी नाही,तर यांच्या विकृत
 मानसिकतेसाठी हानीकारक ठरतात".
म्हणून ते गांधी नाकारतात.
  पुढल्या वर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीची पंचाहत्तरी आहे.हा दिवस देशासाठी आनंदाचा नसून,या मागील विचार लोकशाहीला,धर्मनिरपेक्षतेला,देशाच्या संविधानाला आणि एकंदरीतच स्वातंत्र्याला घातक आहेत.हे जर समजू शकलो तर गांधीना किती ही दुषने दया,हरकत नाही.बापू तुमचा द्वेष करणारं नाहीत. पण,गांधींचा भारत मात्र सुरक्षित राहिल याचा आनंद त्यांना मात्र नक्की होईल.सध्या तरी एवढंच ! 

बापूंना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !
जय भारत🙏🇮🇳

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

  1. खूप छान, विचार करून योग्य आहे ते,टिकाव म्हणून आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे करून दिलेली जाणीव आणि जबाबदारी आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र