जय जवान जय किसान
जय जवान जय किसान जय जवान जय किसान हा भारतामध्ये प्रथम नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्रीजी.१९६५ साली भारत-पाक युद्ध दरम्यान हा नारा शास्त्रीजींनी दिला होता.शेतकरी,कष्टकरी,जवान हे आपल्या देशाचे पालक,पोषक व संरक्षक आहेत.आज हे आहेत म्हणून,आपण आहोत.शेतकरी शेतात राबराब राबून आपल्यासाठी अन्नधान्य उगवतो.कष्टकरी श्रमाची कामे करून आपल्याला सुख सोयी उपलब्ध करून देतात.सैनिक सीमेवर सतत पहारा,लढा देऊन आपल्याला परकीय आक्रमणांपासून वेळेला स्वतःचा प्राण देऊन संरक्षित करतात.जो पर्यंत हे सगळे आहेत आपण आपापल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू.पण सध्याची भारतातील परिस्थिती गंभीर आहे. आज किसान व कष्टकरी यांच्यावर अन्याय होत आहेत.त्या अन्याया विरोधात ही शेतकरी व कष्टकरी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शांततेत निदर्शने करत आहेत.पण हुकूमशाही शासक बळाचा वापर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.बळाचा वापर अर्थातच पोलीस,सैन्यांच्या माध्यमातून होत असतो. जे जवान व किसान देशाच्या प्रगतीचे भागीदार होते ते आज हुकूमशाही शासनामुळे आमने-सामने उभे आहेत.शेतकरी ब...