२८ नोव्हेंबर आज खरा शिक्षक दिन..महात्मा फुले स्मृतिदिन !
२८ नोव्हेंबर,आज खरा शिक्षक दिन..
आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन !
अशिक्षित राहिल्याने बहुजनांची प्रगती खूंटली.
वैचारीक,मानसिक,शारीरिक गुलामगिरी पत्करून ते शुद्र झाले.स्त्रिया चुल आणि मूल,रुढी परंपरा यात अडकून शुद्रादी शुद्र झाल्या..
थोर विचारवंत,समाजसुधारक,स्त्री शिक्षणाचे जनक,शेतकर्यांचे कैवारी,सत्यशोधक समाजाचे जनक,समतावादी,परिवर्तनवादी महात्मा जोतिबा फुले यांनी कृतिशिलतेची वाट दाखवून प्रगतशील समाज निर्माण करण्याचे महान कार्य केले.आज ही महात्मा फुले यांच्या वैचारीक्तेची गरज आपल्याला भासते.महात्मा फुले यांच्या विचारांचे पाईक होवून वैचारीक कृतिशिल परिवर्तन आपल्यापासून सुरू करणे हे आपले परम कर्तव्य समजावे.मी माझ्या वैचारिकतेमधे,कृतिमधे फुले दांपत्यास स्मरून अनेक बदल घडवून आणले आहेत.ज्याने माझी व माझ्या कुटुंबाची वैचारीक वृद्धी होत आहे.माझ्या ह्या छोट्याशा प्रयत्नातून महात्मा फुले यांना खऱ्या अर्थाने त्रिवार शिवाभिवाद्न !!!
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
॥ जय ज्योती ॥
॥ जय सावित्री ॥
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
https://youtu.be/a-M1W3Xp9N0
उत्कृष्ट लेखन👌
ReplyDelete॥ जय ज्योती ॥
॥ जय सावित्री ॥