भारतीय संविधान दिन
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशाने एक नवी उभारी घेणं आवश्यक होत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.त्याचे स्वतंत्र राज्यकारभार असणं आवश्यक होतेच,पण ते पूर्णतः इंग्रजांच्या पॉलिसीवर केंद्रित नसावं अशी भारतीयांची धारणा होती.पण तरी ही ब्रिटिशांच्या माध्यमातून आपले स्वतंत्र संविधान असाव ज्याने भारताला स्वातंत्र्य होण्यास व नंतर उपयोग होईल या विचाराने स्वातंत्र्या आधीच संविधान सभेची/समितीची स्थापना करण्यात आली होती.
६ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभा स्थापन करण्यात आली व ९ डिसेंबरला पहिली बैठक सभेने घेतली होती.सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य होते.
नंतर जून १९४७ मधे ही संख्या घटत गेली व २९९ इतकी झाली.१९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर,संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले आहे.
संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद व उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी होते.जवाहरलाल नेहरू यांनी वस्तुनिष्ठ ठराव घटनेची मूलभूत तत्त्वे मांडली. जी नंतर घटनेची प्रस्तावना ठरली.हा वस्तुनिष्ठ ठराव सर्वानुमते स्वीकारला गेला.मसुदा समिती नेमली गेली.मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.डॉ.आंबेडकर यांनी मसुदा समितीच्या वतीने २ वर्ष ११ महिने व दिवसात १८ संविधान पूर्ण करून ते डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या कडे सुपूर्त केले.
हे आपले संविधान म्हणून ह्या दिवशी स्वीकारले गेले.
तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९.पुढे २६ जानेवारी १९५० रोजी संविधान गणराज्य भारतांमधे अंमलात आणल्या गेले.
भारताचे संविधान है जगातील सर्वात मोठे संविधान आहे.अनेक देशांच्या संविधानांचा योग्य अभ्यास करून भारतचे संविधान लिहिले आहे.
भारताच्या संविधाना मधे सध्या ४४८ अनुच्छेद,
१२ अनुसूची,२५ भाग व १०४ संशोधन समाविष्ट आहेत.
भारताच्या खऱ्या सर्वांगीण विकासामध्ये संविधानाचे फार मोठे योगदान आहे.भारताचे संविधान न्याय,स्वातंत्रता,समानता प्रस्थापित करते व बंधूता निर्माण करण्याचे कार्य करते.संविधान मला भारताची नागरिक म्हणून मान्यता तर देतेच पण त्याच बरोबर मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार,स्वातंत्र्य,हक्क ही प्रदान करते.संविधान हे भारताच्या लोकांनी,भारतातील लोकांकडून, भारताच्या लोकांसाठी निर्माण करून मान्य केलं आहे.त्यामुळे संविधान कोणा एका व्यक्ती अथवा समूहाचा अधिकार नसून भारतातील प्रत्येक व्यक्तीचा संविधानावर समान हक्क आहे.नुसतच हक्क नाही तर संविधाना प्रति आदर असावा व त्याचे रक्षण कार्य प्रत्येकाचे आहे हे विसरता कामा नये.अधिकारा बरोबर कर्तव्य देखील येतात हें लक्षात असुद्या.
भारताचे संविधान लवचिक आहे. भारत प्रगतीशील देश आहे.जसजसा काळ बदलेल संविधानात काही आवश्यक बदल होणे देखील अपेक्षित आहे. जनहितासाठी काही त्रुटी भासल्यास त्यावर कायद्याने सर्वांगाने विचार व्हावा मगच बदल स्वीकारले जावे.संपूर्ण संविधान बदलावा ही अपेक्षा नाहीत,पण काही लोक,समूह हे संविधानाच्या विरोधी भूमिका घेताना दिसतात.संविधानाच्या प्रति जाळण्याचे काम देखील ह्याच मनुवादी विचारसरणीने केली आहे. आपले मत मांडण्याचा अधिकार याच संविधानाने आपल्याला दिले आहे,परंतु प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात.अधिकार,स्वातंत्र्य आहे म्हणून चुकीचा मार्ग अवलंबन होत नाही.आपले अधिकार हक्क व स्वातंत्र्य सिद्ध करण्याच्या भानगडीत इतरांचा अधिकार,हक्क व स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी कोण घेणार ?
संविधानाचा अवमान करणे योग्य नाही..
भारताचे संविधान हे देशाचे महत्त्वाचे दस्तावेज वा ग्रंथ आहे.सर्वांना समान न्याय प्रदान करण्याचे कार्य या द्वारे निश्चित होते व व्हावे.संविधान हे मानवाने निर्माण केलेले आहे.मानव हितासाठी जरी ते लिहिले असले तरी ते कालसापेक्ष आहे.आधी उल्लेख केल्याप्रमाणे म्हणून ते लवचिक आहे.संविधान चुकीचे किंवा वाईट नाही.त्यावर आपल्या सत्तेचा अंमल दाखवणारी प्रवृत्ती ही वाईट असू शकते.सध्या तरी तेच दिसत आहे.संविधानाचा गैरवापर कोणा एकाच्या स्वार्थासाठी होवू नये ही दक्षता वेळीच घेतली पाहिजे.सांविधानिक तरतुदी आहेत म्हणून त्या जाणवत नाहीत.संविधान नसेल तर काय होईल याचा एकदा विचार करावा ?
आज संविधान पूर्ण होऊन ७१वर्ष झाले आहेत. अनेकांना संविधान निश्चित फायदेशीर ठरले आहे. पण अनेक बाबी ह्या अंमलाविना आहे तशाच राहिल्या आहेत,हे मान्य करावे लागेल.न्याय,स्वातंत्र्य, बंधुता हे आज देखील समान नाहीत.पैसा,ताकद, कायद्याच्या चुकीच्या प्रभावामुळे काही लोक त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करत आहेत. संविधाना बाबत अपप्रचार सुरू आहे.मी पुन्हा एकदा सांगते संविधान कोणा एका व्यक्ती अथवा समूह,गट यांची मक्तेदारी नाही.संविधान हे भारताच्या जनतेसाठी आहे.कोणीही त्यावर अधिराज्य गाजविण्याचा अथवा,नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.
संविधान अभ्यासक यांनी जनसामान्य जनतेबरोबर पुढे येऊन संवाद साधणे,संविधानातील काही त्रुटी असल्यास,योग्य बदल अपेक्षित असल्यास त्यावर चर्चा करणे अपेक्षित आहे.संविधान नक्की काय आहे हे सर्वसामान्य जनतेने समजून घ्यावं व त्याबद्दल इतरांना सांगावं.जो पर्यंत हे होत नाही तोपर्यंत निश्चित एक भूमिका भारताचे नागरिक या नात्याने संविधानाचे संरक्षण केवळ अशक्य होईल.
आपला आजचा गाफीलपणा येणाऱ्या पुढच्या पिढीला हुकूमशाहीचे बंधक बनू नये एवढीच अपेक्षा !
सोबत pdf file जोडत आहे. भारताचे संविधान उद्देशिका साध्या, सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आज त्याचे वाचन जरूर करावे !
https://1drv.ms/w/s!AlafGmYCw8scgkcuzkbXDAQPVAew
जय भारत !
जय संविधान !
भारतीय संविधान चिरायू होवो !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment