वटसावित्री
सत्यवानाची सावित्री आणि ज्योतिबाची सावित्री माझ्या दृष्टीने दोन्ही बुद्धिवादी.त्यांच्यामध्ये तुलना होणे नाही.एका स्त्रीला महान ठरवताना दुसऱ्या स्त्रीला अपमानित व्हावं लागतं असेल तर ते मला मान्य नाही.सत्यवानाच्या सावित्रीने मला वड पुजायला सांगितला नाही किंव्हा असलं कोणतं व्रत ही सांगून गेली नाही.तिच्या कथेतून मी सकारात्मक,बुद्धीला पटेल तेच आत्मसात करेल. मी दोन्ही सावित्रीची वैचारिक कृतिशीलतेची कास धरून हे मानव जीवन सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेल. अनावश्यक रूढी परंपरा छेदून माझं अस्तित्व मी निर्माण करेल.परिवर्तनाचा मार्ग सर करताना मानवहित,समाजहित जोपासेल.माझ्या कुटुंबीयांची सर्वोत्परीने काळजी मी घेईल.माझ्या मुलीला व मुलाला मी बुद्धिप्रामाण्यवादी असे संस्कार देईल व वैचारिक कृतिशीलतेचा परिवर्तनाकडे घेवून जाणारा वारसा वृद्धिंगत करेल. आयुष्याच्या पानावर ऊन,वारा,पाऊस,वादळ असो वा निरभ्र,शांत,मोकळे आकाश,माझ्या जोडीदाराचा हात घट्ट धरून सगळे ऋतू आनंदाने सर करेल. वडाला दोर बांधून नवऱ्याचं आयुष्य दीर्घ व्हावं म्हणून वडाला विनवण्या करण्यापेक्षा,मिळालेलं आयुष्य त्याच्याबरोबर आनंदाने,प्रेमाने व आरोग्य...