आज होळी .. म्हणजेच शिमगा..

आज होळी .. म्हणजेच शिमगा.. होळी हा सण कि उत्सव? त्या विषयी नेमकी अशी माहिती द्या असे अनेकांनी सूचित केले होते. *डॉ. अशोक राणा लिखित "सणांची सत्यकथा"* या पुस्तकातील होळी विषयी थोडी माहिती इथे देतं आहे. हे पुस्तके सर्वांनी वाचावे असा आग्रह माझा आहे. इथे संपूर्ण लेख न देता त्यातील काही भाग देतं आहे याची नोंद घ्यावी. प्रत्येकाला आपली मुळे शोधता आली पाहिजेत. त्यासाठी शोध घेता यायला पाहिजे. उत्सवांमधून समूहभावना व्यक्त होते. तसेच बदलत्या संदर्भाचे कोंदण उत्सवाच्या स्वरूपाला नवेपण आणते. म्हणून अनेक सण-उत्सव बदलत्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संदर्भातही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्या बदलत्या स्वरूपातही त्यामागील हेतू मात्र व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही. होळी हा कोणत्यातरी प्रवृत्तीचा निषेध करणारा उत्सव तसेच सणही आहे. उत्सव सामूहिकपणे, तर सण हे व्यक्तिगत स्वरूपात कुटुंबात साजरे करायचे असतात. होळीच्या सणाला शिमगा म्हणूनही संबोधतात. शिमगा करणे म्हणजे निषेध करणे असा वाक् प्रयोग मराठीत आहे. शिमग्यालाच गोव्यामध्ये 'शिगमा' असेही म्हणतात. होळीच्या सणामागी...