अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार !
अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार !
अखंड ही सृष्टी ज्ञानाचीया भंडार, जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी,चराचर.
दगडाला फुटे पाझर,
त्यातून जल वाहे निर्झर.
मानवाचे काळीज का धोंड्याहुनी कठोर,
रक्ताचे पाट वाहे,तरी स्थब्द अन निष्ठुर.
इवलेसे ते पुष्प उमलती,
खडकाचे ते उर भेदती.
माझे जीवन संघर्षाचे,
मनुजा लढ तु,हे प्रयास तयाचे.
पर्वते भिडती नभास,
यश सम जणू ती शिखरे आम्हास.
पंख ते पसरुनी उंच घेइ भरारी,
दावे मार्ग स्वातंत्र्याचा खग गगनावरी.
इवलेसे अंकुर भुईत रुजूनी,
क्रम दावती संघर्षाचा,
मूळ तयाचे घट्ट रोवूनी.
सूर्य मज सांगे पुन्हा उगवणे,
आयुष्य हे असे निभवणे.
ठेचं लागतात अडखळला तरी,
पुन्हा नव्याने घे उभारी.
चंद्र चमके चिरून तिमिरा,
भेदुनी अंधक्कार,हो उजागर.
मूळ मंत्र हा जाणून घे,
फुलेल त्यातून जीवन अवघे.
मनुष्या नको पाहूस सुख क्षण भंगुर,
एकमेका सहाय्य मानवा हाच खरा तव शृंगार !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment