कोरोना आणि लस - एक षडयंत्र
कोरोना आणि लस - एक षडयंत्र
काही महिन्यांपूर्वी माझ्या परिचयातील एका डॉक्टरांनी (रिसर्च) माझ्यासोबत चर्चा करताना कोव्हीडला अनुसरून अनेक विषयांचा खुलासा केला होता.
त्यांनी भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांविषयी सांगितलं होत. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चिंता त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रकारचे आजार बळावतील, असं ही म्हणाले होते. त्यामधे कॅन्सर, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक, रक्ताच्या गुठुळ्या होणं या सारखे अनेक आजार अधिक तिव्र स्वरूपाचे असतील. कॅन्सरचे तर कोरोनासारखे variation's दिसतील ! म्हणजे, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे धोके वाढतील असं स्पष्ट केलं.
या मधे 12 वर्षावरील मुला मुलींना ही कोव्हीड लस टोचवण्याचा हलकटपणा केला गेला. यामुळे लहानमुलांना ही या संभव्य धोक्यांना सामोरं जावं लागेल. मुली महिला पिशवीच्या आजाराने (कॅन्सर) अधिक त्रस्त होतील. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचे ही भवितव्य या मुळे धोक्यात आहे. यापेक्षा अधिक काय नुकसान कोरोनाच्या आड या हरामी लोकांनी करायचं राहिलं आहे सांगा?
1) घोड्यावाल्याला सरकार लस बनवायला देवूनच कशी शकते?
2) कोणती ही लस माणसांना खात्रीशीरपणे रोग निवारण करण्यासाठी इतक्या लवकर उपलब्ध होणं शक्य आहे का? (करणं लसीची चाचणी, त्यावर अनेक प्रयोग होणं अपेक्षित आहे. हा कालावधी 3-5-10 त्या ही पेक्षा अधिक वर्ष असू शकतो. मग आपल्याला जागतिक पातळीवर ही कोरोनाची लस इतक्या लवकर कशी उपलब्ध झाली?)
3) लोकांना या लस घेण्यासाठी सक्ती का करण्यात आली?
4) सुशिक्षित लोकांनी (या मधे मेडिसिन मधे असणारे उच्चं शिक्षित प्रथम होते) कोणता ही विचार न करता का या लस टोचवून घेतल्या?
6) जागतिक पातळीवर इतके भयानक षडयंत्र कोणी व का रचले?
7) माणसांचे जीव कशासाठी घेतले गेले?
हे व असे अनेक प्रश्न मला सतत सतावतात.
आधी मला ही असच वाटत होत, ही लस दिल्याने जर लोकांचे जीव वाचत असतील तर त्यांचा पुरवठा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तस व्हिडीओ मधे सुद्धा मी मत व्यक्त केलं होत. तरी ही या विषयी मला पूर्ण शाश्वती नव्हती. जो पर्यंत खरच गरज पडणार नाही तो पर्यंत आपण लस घ्यायची नाही हा निर्धार केला. खरं तर हा एक प्रयोगच होता. जर हा कोरोना धोकादायक व त्यावर दिल्या जाणारी लस खरच उपयोगी असते, तर..
या विषयी माहिती मिळाल्यावर या परिचित डॉक्टरांनी माझे अभिनंदन केले. कारणं मी स्वतःला व माझ्या कुटुंबाला लस नं घेवून या भयानक षडयंत्रापासून दूर ठेवू शकले. परंतु, कोट्यावधी लोकांचे नक्की भवितव्य काय असेल? या विचाराने आज ही सुन्न व्हायला होत.
खरं तर या विषयी विस्तृतपणे खुप आधीच लिहायचं, बोलायचं होता. परंतु, हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. त्यात पुरावा काय व कसा द्यावा? हे प्रश्न असतातच. कारणं म्हणतातना सत्य पायात चप्पल घालू पर्यंत असत्य गावभर हिंडून येत. असत्याला पुरावा लागतं नाही. ती विकृती आहे. सहज पसरते. आता तर या बाबतच्या बातम्या येवू लागल्या आहेत. अधिक काळजी वाटत आहे. मला ज्या वेळी हे समजल होत, मी अनेकांना या विषयी तस सांगितलं. खरं सांगते, सर्वांच्या प्रतिक्रिया गंभीर होत्या. आता काय करायचं ? हा सर्वांचा प्रमुख प्रश्न. यावर काय करता येईल हे तर तूर्तास मला माहीत नाही. परंतु, विज्ञानाचा गैरवापर होतो, तसा त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणात होतचं आहे. या वर ही काही उपाय असेलच ! पण त्या ही पेक्षा आज असं वाटत आहे जसा कोरोना एक षडयंत्र होता, तसेच ही देखील एक अफ़वा असावी. लस घेतलेल्या लोकांना काही हानी होणार नाही हे सत्य असावं. बस ! इतकंच या निमित्ताने व्यक्त व्हायचं होत.
जगभरातील मूठभर स्वार्थी हरामखोरांमुळे आणखीन लोकांना काही त्रास होवू नये इतकीच इच्छा आहे. सर्वांनी काळजी घ्या.
-प्राची
Comments
Post a Comment