लढवय्या मी
लढवय्या मी
मी व्यक्त होवुनी
मुक्त जाहले
संसाराचा भार झेलुनी
स्वतःला ही मी सावरले
दुःख,भय,संकट जसे
ऊन,वारा,पाऊस सम
पदराखाली संरक्षित,संसार माझा
ह्या सकलापासूनी दूर
काय करू,काय नको
भ्रमात मी रात्रं दिन
प्राधान्य मज माझे कार्य
त्याहून प्रिय मज माझे प्रियजन
तारेवरची कसरत कसली
मनधरणीने कंबर बसली
युद्ध रोज नवं नवे
घेवूनी येती आव्हाने
सामना मज आव्हानांशी
त्यांना ही मी पुरून उरेल
वारसा हा संघर्षाचा
त्यातून मी आणखीन फुलेल
शांत समई सम माझे असणे
वेळ पडता होईल वणवा
रूढी,परंपरा मज ज्या प्रतिबंध
पेटून देईल समदे
ना बंदिनी,ना अभागी
हे नव्हे सत रूप माझे
लढवय्या मी भाग्य कारिणी
मी तटिनी अन मीच अवनी
मूर्त रूप हे मातीत गाडुनी
प्रगती माझी कुंठित कशी
अंकुरेल पुन्हा पुन्हा मी
खासियत ही मोडू कशी
समजून घे हे हेवे दावे
हे नारी तू स्वयंभू
पुन्हा सज्ज हो लढाया आता
हो जिजाऊ,सावित्री,अहिल्या अन रमाई माता !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment