जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान हा भारतामध्ये प्रथम नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लाल बहादुर शास्त्रीजी.१९६५ साली भारत-पाक युद्ध दरम्यान हा नारा शास्त्रीजींनी दिला होता.शेतकरी,कष्टकरी,जवान हे आपल्या देशाचे पालक,पोषक व संरक्षक आहेत.आज हे आहेत म्हणून,आपण आहोत.शेतकरी शेतात राबराब राबून आपल्यासाठी अन्नधान्य उगवतो.कष्टकरी श्रमाची कामे करून आपल्याला सुख सोयी उपलब्ध करून देतात.सैनिक सीमेवर सतत पहारा,लढा देऊन आपल्याला परकीय आक्रमणांपासून वेळेला स्वतःचा प्राण देऊन संरक्षित करतात.जो पर्यंत हे सगळे आहेत आपण आपापल्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू.पण सध्याची भारतातील परिस्थिती गंभीर आहे.
आज किसान व कष्टकरी यांच्यावर अन्याय होत आहेत.त्या अन्याया विरोधात ही शेतकरी व कष्टकरी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शांततेत निदर्शने करत आहेत.पण हुकूमशाही शासक बळाचा वापर करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.बळाचा वापर
अर्थातच पोलीस,सैन्यांच्या माध्यमातून होत असतो.
जे जवान व किसान देशाच्या प्रगतीचे भागीदार होते ते आज हुकूमशाही शासनामुळे आमने-सामने उभे आहेत.शेतकरी बाप आणि सैनिक मुलगा समोरासमोर असल्यासारखं भासत आहे.परवाच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलकांवर केलेल्या पाण्याचा फवारा, लाठीमार,अश्रुधूरांचा मारा यामुळे एका शेतकरी बापाला आपले प्राण गमवावे लागले.तर दुसरीकडे त्याच शेतकऱ्याचा मुलगा सीमेवर शहीद झाल्याचे कळेल.खरंतर दोघेही चुकीच्या व्यवस्थेचेच बळी म्हणायला हरकत नाही.प्रश्न देशांतर्गत असो वा सीमेवरचा,हुकूमशाही शासकांच्या नाकर्तेपणाचा दंड देशवासीय भोगत आहेत हे मात्र शंभर टक्के खरे आहे.
मे देश नही बिकने दुंगा..म्हणत म्हणत हरामखोरांनी सगळं विकायला काढल.जो देश विविधतेने नटलेला आहे.जो समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य, सार्वभौम असा माझा भारत देश आहे.जिथे न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता प्रस्थापित होते.ह्या माझ्या भारतचे जात-पात,उच्च-नीच,शेतकरी-व्यापारी, कष्टकरी-व्यापारी,सैन्य-शत्रू,सैन्य-शेतकरी असे अनेक भेदाभेद निर्माण करून तो सुटाबुटातला कन्हैया रसातळाला नेण्याचे काम खुब करत आहे.
शेतकऱ्यावर अन्याय होतोय,ही भूमिका मांडून भाजप,मोदी सत्तेत आले.आज तेच शेठ बनून शेतकऱ्याच्या मुळावर उठलेत.शेतकऱ्यांप्रमाणे जवानांचे देखील नाहक बळी जात आहेत.सैन्याला शत्रूच्या बंदुकीचे भक्षक बनवायचे आणि स्वतः मात्र शत्रूच्या मांडीला मांडी लावून बसायचं.हे यांचे धंदे..
शेतकरी विरोधातील कायदे असो वा चीन-पाक यांच्यातील शत्रुत्व.दोन्ही भूमिकेमध्ये केंद्र सरकारची पोलखोल झाली आहे.मन हेलावून सोडणारी छायाचित्र आपण शेतकरी,जवान यांच्या बाबत पहात असतो.पण एवढ्यावरच थांबून चालणार नाही.आज परिस्थिती आपल्या विचारांच्या कोसो पुढे धाव घेत आहे.लाठी मारून थकलेल्या सैनिकाला शेतकरी पाणी पाजू शकतो.वेळ आली तर भाकर देखील भरवू शकतो.कारण तो स्वयंभू आहे.पण पोलीस,सैनिक हे आदेशाचे बांधील आहेत.काहींना मुळातच माज देखील आहे.ते मूठभर असतील,परंतु ह्या मूठभर माजुरड्या लोकांमुळे व हुकूमशहा केंद्र सरकार मुळे आज शेतकऱ्यावर जीवघेणा मारा होत आहे.शेतात बांधावर झाडाला फास घेऊन,विष पिऊन आधीच शेतकरी आत्महत्या करत आहे.आता सरकार पुढे आपली बाजू मांडण्यासाठी त्याला एवढा संघर्ष करावा लागत आहे.पाण्याच्या तोफा,अश्रूधुरांच्या नळकांड्या,लाठ्या खाऊन शेतकरी रक्तबंबाळ होत आहे.बंदुकीच्या गोळ्या आणि तोफा तेवढ्या बाकी आहेत..हे निर्लज्ज सत्ता पिपासू लोक तेवढं करायला धजावणार नाहीत,याची खात्री आहे.
अहंकाराने,द्वेषाने,अहंपणाने,कपटाने,निरपराधांच्या रक्ताने माखलेला माणूस देशाचा पंतप्रधान होतो आणि त्याचा सहकारी एक तडीपार केंद्रातील गृहखातं पाहतो. यापेक्षा देशाच्या वाईट परिस्थितीचे मोजमापन आणखीन काय करणार.
माझी देशातील तमाम बांधव भगिनींना कळकळीची विनंती आहे.भूलथापांना बळी पडू नका.तो शेतकऱ्यांचा,कष्टकऱ्यांचा,सैनिकांचा,इतरांचा प्रश्न आहे.एक बातमी म्हणून चघळून थुंकू नका.आपला पालनकर्ता,पोषणकर्ता,संरक्षणकर्ता धोक्यात आहे. त्यासाठी जागे व्हा.आज परिस्थिती त्यांच्यावर काळ बनून घाला घालत आहे.उद्या ही वेळ तुमच्यावर येईल.
गेल्या काही वर्षात देशाचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या हुकूमशाही,निरंकुश सत्ताधाऱ्यांची झळ पोहोचलीच आहे.ती तुम्हा आम्हाला पूर्णतः खाक करण्याआधी जागे व्हा.आपआपल्या पातळीवर या अन्याय विरोधात उभे राहा.लढा द्या.आज आपल्या शेतकरी,कष्टकरी बांधव भगिनींना आपली आवश्यकता आहे.ते त्यांचा लढा देत आहेत,पण त्यांना साथ व पाठिंबा देणे आपलं कर्तव्य आहे.त्यांच्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा !
तो आत्मविश्वासाने लढा लढेल.शेतकऱ्यांना मारक ठरणारे विधायक आहे,त्या विरोधात तो लढा देत आहे.
तो आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे.हा देश मूठभर व्यापाऱ्यांचा नाही.आपला आहे.हे दाखवण्याची हीच वेळ आहे.प्रगती व्हावी,निश्चितच व्हावी ! आपण परिवर्तनवादी लोक आहोत.पण आमच्या शेतकरी,कष्टकरी,जवांनांच्या छाताडावर गोळी झाडून व्यापाराला मोठं करण्याचं काम केंद्र सरकार करत असेल आणि आपण गप्प राहून मूक संमती देणार असाल तर हा देश तुम्हाला माफ करणार नाही.तुमची पुढची पिढी देखील तुम्हाला माफ करणार नाही.
देशांतर्गत संघर्ष थांबला पाहिजे.शेतकऱ्यांवर उठणारी ती हुकूमशहाची लाठी जी जवानांच्या हाती आहे.ति हुकूमशहावरच उलटली पाहिजे.सर्वात महत्वाचे,
स्वयंघोषित देशभक्तांनी आपली अक्कल पाजळून देशभक्तीची सर्टिफिकेट आपल्या फॅक्टरीतून वाटप करणं बंद करावं.तुमचे विचार आणि कृतीतून तुम्ही दाखवून दिल आहे,खरे देशद्रोही कोण आहेत.
माझ्या तमाम देशबांधव भगिनींनो एक व्हा आणि एकात्मतेची ताकत दाखवण्यास सज्ज व्हा !
हा देश आपला आहे.तो पुन्हा पारतंत्र्यात जाण्यापासून रोखले पाहिजे.नाही तर गुलामी अटळ आहे.
जय किसान
जय जवान
जय भारत
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment