गुढी पाडवा चिकित्सा
गुढी पाडवा चिकित्सा
आपण गुढी पाडवा का ? कधी व कसा साजर करतो ?
हे प्रमुख तीन प्रश्न उपस्थित रहातात.
भारतीय मूळ सण हे निसर्ग,शेती(कृषि)या वर आधारित असतात.तसाच पाडवा हा सण म्हणून का साजर करतात ? याकडे जर या दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल.
→ चैत्र महिन्यात वसंत ऋतु शुरू होतो.आधीच्या शिषीर ऋतुमधे झाडांची पानगळ झालेली असते.
वसंत ऋतु मधे झाडांना नवी पालवी फुटते.याला चैत्र पालवी म्हणतात.आंब्याला मोहर येतो,विविध फुल झाड बहरतात.हा नैसर्गिक बदल सर्व सजीवांसाठी आल्हाददायी भसतो.नवनिर्मितीची प्रक्रिया हा निसर्ग नियम आहे.मानवासाठी हा बदल नव चैतन्य घेवून येतो.निसर्गाप्रति कृतज्ञ भाव या सण,उत्सवातून दिसणं अपेक्षित आहे.यामध्ये निसर्ग पुजन आलं.आपण कृषक वंशीय आहोत.निसर्गाचा ऱ्हास करून निसर्गा प्रती आदरभाव म्हणजे दोगलेपणा होय.आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या मूळ परंपरांना आपण मूठ माती देत भेसळ झालेले सण आनंदोत्सव म्हणून साजरा करत आहोत.गोड धोड पदार्थ करणं आनंदोत्सवाचाच भाग.कडूलिंबाचापाला दाहकता कमी करण्यासाठी नेहमीच उपयोगी असतो.पण इतर कोणती ही अनावश्यक अतिशयोक्ती निरर्थकच.आता आपण गुढी पाडवा खरं का साजरा करतो हे पाहिलं.
आपल्याला पाडवा का साजरा होतो हे अनेक तर्क वितर्क असलेल्या कथा,आख्यायिका सनातनी हिंदू धर्माच्या पोथी पुराणं यातून सांगितलं जात.अर्थात मी हे काहीच मानत नाही.परंतु आपल्याला मूळ सणांमधील भेसळ समजावी म्हणून ही भेसळ मुद्दामून इथं मांडत आहे.
पोथी पुराणांप्रमाणे गुढी पाडवा का साजरा करावा याची काही कारणे खालील प्रमाणे →
१) ब्रह्म पुराणाप्रमाणे या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली.
२) रावणाच्या वध करून १४ वर्षांच्या वनवासातून अयोध्येला राम परतला,म्हणून तिथल्या रयतेने पाडवा साजरा केला होतो.
३) या दिवशी म्हणे पंचांगाचे वाचन आणि सरस्वतीचे पूजन होते.
४) महाभारतात इंद्राशी जोडलेली पाडाव्याविषयीची एक वेगळीच कथा आहे.
५) शालीवाहन शकास सुरुवात झाली.
अशा एक ना अनेक कथा,आख्यायिका आपल्याला दिल्या गेल्या आहेत.या सगळ्यात शेवट ५ व्या नंबरची काय ते सत्य घटीत.बाकी सब पुराणं कथा.
या पुराणांनुसार गुढी पाडव्याला आज आपण उभी करतो तशी गुढी ही आपली परंपरा आहे म्हणे.
खरं तर गुढी म्हणजे पताका,ध्वज,झेंडा.इतिहासातील नोंदी लक्षात घेता शिवाजी महाराजांच्या इतिहासात आज आपण उभारतो अशी गुढी उभारल्याचा उल्लेख आढळत नाही.गुढी उभारने म्हणजे पताका अथवा ध्वज उभारने.
स्वराज्य ध्वजाची गुढी शिवरायांनी उभारली होती.
या पूर्वीच्या ही ऐतिहासिक पुराव्यानुसार साडी गुंढाळून गुढी उभारल्याची नोंद नाही.या अशा प्रथा काळानुसार जाणीवपूर्वक समाविष्ट केल्या जातात.
हिंदू धर्मातील प्रमुख सण म्हणून गुढी पाडवा साजरा होतो.आज हिंदू धर्मात कोणती वस्ती कुठें ठेवायची,कशी ठेवायची.अशी ठेवली तर शुभ नाही तर अशुभ.या सगळ्याच एक मोठं शास्त्र आहे.मग या गुढीवर तांब्या उपडा(उलटा) का? काही अतिहुशार म्हणतील की तो त्यावर उभा कसा रहाणार वगेरे..इथे मुद्दा हा आहे की अशी विचित्र गुढी उभारायचीच कशाला? याच्या मागे काय कारणं आहे.काही लोक साडी ऐवजी एखाद वस्त्र वापरतात.ठीक,पण इतर सामग्रीचा काय? माणूस मेल्यावर ते मढ घेवून जाण्यासाठी ज्या वस्तू वापरतात त्याचं गुढीसाठी लागतात.बांबू,कडूलिंबाचा पाला, हार,वस्त्र,इत्यादी.बरं तांब्या पण उपडा.जो हिंदू संस्कृतीप्रमाणे अशुभ मानल्या जातो.
जे हिंदुत्वाचा जप करतात त्यांना हे कसं चालत?
या पेक्षा जी खरी गुढी म्हणजे भगवा ध्वज जो मांगल्याचे, शौर्याचे आणि भागवत धर्म म्हणजेच वारकरी सांप्रदायाचे,छत्रपतींच्या स्वराज्याचे प्रतीक आहे.
का उभारू नये?पण नाही.कारणं या मागे असणारे सनातनी मनसुबे अलग आहेत.
छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्यू नंतर ही अशी गुढी उभारण्याची अपमान जनक प्रथा सुरु करण्यात आली.आम्ही अस सांगितल की पुरावे मागितले जातात.पण या प्रकारची गुढी पूर्वी उभारल्याचे पुरावे तरी आहेत का ? हे यांनी सांगावं.हालहाल करून शंभूराजेंना मारलं व त्यानंतर भाल्याच्या टोकावर त्यांचं शीर लावून धिंड काढली.साखर वाटली.हे करणारे मुघल होतेच,पण या मागे सनातनी ब्राह्म प्रमुख होते.शंभुराज्यांच्या बलिदानाची कुचेष्ट त्यांच्या मृत्यूनंतर अशी गुढी उभारून करण्यात आली? हा प्रश्न आहेच.
खर तर निसर्ग पूजक,कृषक म्हणून हा सण आपल्याला महत्वाचा.परंतु त्याला अस स्वरूप देवून एक दुखरी जाखम जाणूनबुजून नंतरच्या काळात निर्माण केली गेली.बहुजन महानायक महानायिकांचा इतिहास मलीन करून आपल्या सोयीनं सनातनी आर्यांनी तो असा त्याचा प्रचार प्रसार केला.रावणाचा वध रामानं केला.अतीव द्वेषापायी शंभु राजेंना हालहाल करून मारलं.या आधारावर जर हे सण आहेत तर हे चूकीच आहे.खरं तर पाडवायच्या दिवशी या घटना घडल्या नाहीत.पण पाडव्याच निमित्त मात्र या निषेधार्य घटनांना पाठबळ म्हणून देण्याच षड्यंत्र काळाच्या ओघात यशस्वी झालं.
या दिवसांच मूळ महत्व लक्षात घेवून सर्वांनी हा सण त्या पद्धतीने साजरा करावा.छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागास,संघर्षास,स्मृतिस अभिवादन जरूर करावं.त्यांना बदनाम करण्यासाठीच गुढीचं बदललेलं स्वरूप लक्षात घ्या.मूहूर्त,विधी,आत्ताची गुढी उभारण्याची पद्धत हे सगळं थोतांड आहे.ब्रह्मदेवाची, विष्णूची पुजा या बाबी केवळ वाढीवपणा आहे.साडेतीन मुहूर्तापैकी
एक म्हणून नवीन सोन,वस्तू,वास्तू,वाहनं इत्यादी खरेदी केली जात.खरं तर आनंदी क्षणांसाठी कोणता शुभमुहूर्त नसतो.पण हे केलं नाही तर पंचांगकर्ते धर्ते बेरोजगार होतील.हा सगळा यांचा दांभिक व्यवहारिकपणा आहे.
या सगळ्या लेख प्रपंचाच्या निमित्ताने आणखीन काही चिकित्सक बाबी समोर येतात.त्यांचा ही शोध आपण घ्या.त्या अशा →
ज्या अयोध्येत राम वनवासातून परतला तिथं आपल्यासारखा गुढी उभारली दिसते का बघा.
एवढच काय संपूर्ण भारतात हा पाडवा किती राज्यात असा साजरा होता माहिती घ्या.
जर गुढी पाडवा पोथी पुराणात सांगितला आहे तर सगळीकडे का एक सारखा साजरा होत नाही ?
पौराणिक कथा पण राज्यानुसार बदलतात का ?
हे सर्व काही सनातनी धर्मानुसार सुरु आहे.एक गंमत म्हणजे RSS चे संस्थापक केशव बळिराम हेडगेवार यांचा जन्मदिवस ही आजच म्हणजे गुढीपाडव्याला असतो अस मी वाचलं आहे.येणाऱ्या काळात गुढी जवळ हेडगेवारचा फोटो ठेवायला सांगतिल्यास आश्चर्य वाटून घेवू नका.
असेच सणांचे स्वरूप बदलल्या जाते.येणाऱ्या पिढीला कोणापुढे नतमस्तक व्हायला लावायचं हे आता तुमच्या हातात आहे.
पोथी पुराणं जे सांगतील ते प्रामाण्य मानुन चाललं सोडून द्या.नरहरी कुरुंदकर यांचा एका लेखात या पुराणांविषयी उल्लेख मी वाचला होता.ते एक वाक्य इथं देत आहे.ते म्हणतात,"आपले धर्मग्रंथ आपल्याला कमाल आदरणीय वाटतात याचे एक महत्वाचे कारण,आपण ते वाचत नाही हे आहे".म्हणजे आपण जर आपले धर्म ग्रंथ वाचले तर त्यांचा कितपत आदर राहिलं हे आपल्या ध्यानात आलं असेल.म्हणून आता गुढी कशी उभारायची व आपले सण कसे साजरे करायचे हे तुम्ही ठरवा.
मी माझी चिकित्सक माहिती समोर ठेवली आहे
आणि या मार्गानेच कृती करत माझे परिवर्तन सुरु आहे.
शेवटी एक सांगेन.कार्ल मार्क्स ने सांगुन ठेवल आहे.
धर्म ही आफूची गोळी आहे.आता ही गोळी कोणी जबरदस्तीने ठेवू अथवा आपणच ती ठेवून घेतली असेल.आपण इतके तर सुज्ञ आहोत की आता ती चघळत बसायची की थूकायची ते ठरवा !
सर्वांना चैत्री पाडव्याच्या शुभेच्छा !
जय भारत
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment