निखळ मैत्री..त्याची अन तिची !
निखळ मैत्री
निखळ मैत्री त्याची अन तिची.
काय,आश्चर्य वाटलं ? डोळे विसफरले ?
मला वाटलच..
मैत्री..त्याची अन तिची.
तो तिचा बाप,भाऊ,नवरा,मुलगा,काका,मामा,
कोणी ही असू शकतो,
अन कोणी नसू पण शकतो !
त्याचं ही असच,तिच्यासारखा नातं असत.
पण त्याकडे संशयाने बघणं,
जरा अति नाही का वाटत ?
असतात हजारो फेक,
ती/तो एक नेक.
इतकं साधं गणित,
त्यात कशाला ओढता रेघ..
चांगल्या मैत्रीला नसावा बांध,
हजारो तारे मैत्री एक चाँद.
जी ऐकते,सोसते,काही करायला तयार असते,
मैत्री अशी जी जीवावर उदार होवून हसते.
मैत्री धैर्य,मैत्री मनमोकळेपणा,
समाजाच्या परिघाबाहेर तुमच्या भावनांना मिरवून आणते..ती मैत्री भरून पावते !
अंधारातून उदयाकडे घेवून जाते ती मैत्री,
अन चुकीच्या प्रवाहा विरुद्ध पोहायला शिकवते,
ती असते मैत्री !
त्याची तिची मैत्री अशीच असते,
जग मात्र त्यांच्या भावनांना तोलून बसते.
एक निखळ मैत्री किती काय करते,
दुःख सगळे घेवून सुखाच दान देते,
अन विश्व सारं,उमलू पहाते..
विखारी ते भाव समाजाच्या नजरेतील,
मैत्री टीपत असते,
तुझे माझे विभक्त असणेच,
योग्य समजू लागते.
तरी,तिची त्याची मैत्री
पाण्याचा तळ स्पष्ट दिसावा
इतकी नितळ भासते !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment