मायेची माय माझी..

माझ्या आज्जीचा(आईची आई)रती आईचा आज २३वा स्मृती दिवस !
तिच्या आठवणीने मन व्याकुळ होतंय.
तिच्यासाठी लिहिलेल्या या चार ओळी तिला समर्पित !

मायेची माय माझी..

मायेची माय माझी होती,  
रती,रत्या,रत्नमाला तिला म्हणती. 
दुधावरची साय मी तिची, 
होती ती माऊली जगाची. 

परक्याला आपलंस करणारी,
धरणी ती..समदं आपल्यात समावणारी. 
प्राण्यांना ही वाटे तिचा आधार,
सगळ्यांच्या पोटाला वाढे भाकर चार.

काळाने मात्र घाला घातला,
माऊलीला आमच्या दूर घेवून गेला. 
नातवंडांमध्ये रमण्याची हौस होती तिला,
पोरकी करून पोरं,डाव अर्ध्यावर सोडला..

स्मृती दिवस डिसेंबर सत्तावीस,
वर्ष आज झाली पूर्ण तेवीस.
स्मरण माऊलीचे सदा आमच्या मनी,
दंडवत माझा दोन्ही कर जोडोनी !

प्राची दुधाने

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??