धुक्याची वाट..
धुक्याची वाट..
दाट ती धुक्याची वाट,
त्या पल्याड दिसे सर्व स्पष्ट.
अनिश्चितते पल्याड संधी असे,
त्या सम धुक्यातून तुझ वाट गवसे.
धुके अडथळा किरणांना
होय अवनीवर पोचण्या,
अस्पष्टता वाटेतील रोडा,
धेय्या तुझ्या नेई आड.
उमेद हरपे अशा या धुक्यात..
पण धुके करील जरी वाट अंधुक,
हक्क नसे तीस मार्ग हरपण्यास.
घे खोल श्वास,कर मन घट्ट,
चाल पुढे विश्वासाने सोडू नको हट्ट.
धुके जरी दाटले,
नाही नभ फाटले.
निवड तुझा मार्ग,
होईल जीवन सार्थ.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment