कुणी तरी लेखक कवी आपल्या आयुष्यात ही असावं..
कुणी तरी लेखक-कवी
आपल्या आयुष्यात ही असावं..
कुणी तरी लेखक-कवी
आपल्या आयुष्यात ही असावं..
आपल्या हसण्या-रडण्यावर,
रुसण्या-हिरमुसण्यावर,
रागावर-प्रेमावर अन सगळ्या गमतीजमतीवर,
दिसण्यावर-भासण्यावर,
दुःखाच्या वाटेवर अन सुखाच्या रथावर,
आपल्या हातून घडणाऱ्या चुकीवर अन कर्तृत्वावर..
खरचं कुणी तरी आपल्या जाणते अजाणतेपणे आपलं अस्तित्व टिपणारं,
आपल्या असण्या-नसण्यावर,
आपल्या जाण्यानंतर स्वतःचे शब्द देवून
आपल्याला जीवन देणारं,
मनसोक्त आपलं कौतुक करणारं,
कोणी तरी आपला प्रवास कागदावर मांडणार,
लेखक-कवी आपल्या आयुष्यात असावंच !
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment