आनंदी रक्षाबंधन
आनंदी रक्षाबंधन
रक्षाबंधन हा सण बहीण भावाचं नातं दृढ करणारा सण,असं सांगितले जात.
परंतु रक्षा ही फक्त भाऊ बहिणीची करतो हा समज कितपत योग्य आहे?
पहिला रक्षा करते आई.गर्भधारणेपासून जीवात जीव आहे तोवर डोळ्यांत तेल घालून आपली काळजी घेते.
बाबा ही यात कुठें कमी नाही.कुठें ही असले तरी लक्ष त्यांचे तुम्हावर राही.छोटी असो वा मोठी ताई असते आपली दुसरी आई.आई बाबांच्या ओरड्यापासून ते कोणत्या ही बाबतीत आपल्या रक्षणासाठी सज्ज असते.
ताई फक्त माझी दुसरा वाटेकरू नाही असा सज्जड दम भरून,लवकर लग्न करून जा म्हणतो खरा पण जरा वेळ दिसली नाही की जीव कासावीस होतो असा भाऊ.
मोठा असेल तर बापाची माया ही तो लावी.
आज्जी आजोबांसाठी तर आपण सर्व दुधावरची साय.
त्यांची माया काय कधी आटत नाही.अशी अनेक नाती आपली तत्पर असतात नेहमी आपल्या रक्षणा खातर.
हो पण नात्याच्या ही पलीकडील किती तरी नाती आपल्या कळत नं कळत आपलं रक्षण करतं असतात आपल्याला माहिती ही नसतं.सजीव निर्जीव अनेक व्यक्ती वस्तूंचा समावेश यामधे असतो.बांदापासून सीमेपर्यंत शेतकऱ्यापासून सैनिका पर्यंत. डॉक्टर,साफसफाई कामगार,पोलीस,शिक्षकांना,
निसर्गापासून,घरापर्यंत किती यादी करायची.हे सर्वंच आपले रक्षणकर्ते.स्त्री असो वा पुरुष,मालक असो अथवा कामगार कोणत्या ना कोणत्या प्रकारे सर्वंच आपले रक्षणकर्ते असतात.
चला तर मग हा सण फक्त बहीण भावापुरता सीमित न ठेवता सर्वांसोबत साजरा करू.
आम्ही घरी दर वर्षी नवराबायको,बहीण भाऊ,आई वडील मुलं,आज्जी आजोबा,घर,वृक्ष,कम्युनिटी हेल्पर,
कामगार अशा शक्य त्या सर्वांसोबत एकमेकांना राखी बांधून आनंद व्यक्त करतो.तुम्ही ही असा आनंद या रक्षाबंधना निमित्त घेवून पहा !
सर्वांना रक्षाबंधनाच्या अनेक सदिच्छा !🌹
-प्राची
*सोबत आठवणीतील काही आनंदी क्षण चित्रे ❤️🌹
Comments
Post a Comment