मंगळसूत्र तत्वज्ञान

सकाळ सकाळ तत्वज्ञान वगेरे..😇🤭
  काल मी अमृता फडणवीस यांची एक पोस्ट केली होती.
त्यातील जोडलेला फोटो या पोस्टबरोबर पुन्हा जोडत आहे.मी म्हणाले होते,हे माझं सगळ्यात आवडत व्यक्तिमत्व.किती आत्मविश्वास आहे या व्यक्तीमधे. 
आपल्याला वाटेल ते मांडून(गदारोळ झाला तरी)ही व्यक्ती मात्र निवांत असते.या मंगळसूत्राचा विषयच घ्या ना.किती सहज भारताची रूढी,परंपरा,संस्कार वगेरे वगेरे धुडकावून आपलं मतं,भावना व्यक्त केल्या.
  या संदर्भातील काही प्रतिक्रिया वाचनात आल्या.ही बाई मंगळसूत्राबाबत बोलते ते कस चुकीच आहे हे सांगण्यात बरेच लोक पुढे सरसावले.तिची नेहमीप्रमाणे अक्कल ही काढून झाली.मंगळसूत्र या अलंकाराचा महत्व सांगण्यात 
बाया तर बाया बापे ही मागे नव्हते.पण खरं सांगू का कधी कधी अमृता फडणवीस खरं बोलून जातात.हां आता ते मांडण्याची पद्धत थोडी विचित्र असते.परंतु त्यातून आपल्याला धडा मात्र मोठा शिकायला मिळतो. 
या मंगळसूत्र पुराणाचेच घ्या ना.कसं ते थोडक्यात सांगते.
   जे लोक पिढ्यानंपिढ्या तुम्हा आम्हाला या रूढी,  परंपरा,संस्कृतीचे डोस पाजत आले आहेत ते स्वतः मात्र प्रत्यक्षात याला भिकच घालत नाहीत.ते स्वतःला देव,  त्याचा दूत वगेरे समजतात तो भाग आलाच.परंतु आता  यांच्यातील स्त्रियांना ही आपण दिमाखात मिरवणाऱ्या  परंपरागत रूढी नुसार वागण्याची सक्ती नाही हे यातून पुन्हा समजून येईल.आपल्याला बाईनं मंगळसूत्र घातलेल नाही हे दिसलं की आभाळ कोसळत.पाप,अपशकुन असं काय काय होत रहातं.गंम्मत म्हणजे हे आपल्या मोकळ्या मेंदूत भरणारे पंत अँड कंपनी मात्र या पाप, अपशकुनाच्या अशा सुखाला मुकतात.कारणं ते हे मानतच नाहीत.त्यांना माहीत आहे ही बंधन आहेत आणि आपल्याच महान पूर्वजांनी हे अलंकार स्वरूपात स्त्रीवर लादलं आहे.ते गळ्यात घाला,हातात नाहीतर पायात फरक पडत नाही.मग त्याचं इतकं काय ते टेन्शन घ्यायचं. 
आपण मात्र मंगळसूत्र म्हणजे जणू खरोखर नवराच गळ्यात बांधला की काय असं वागत असतो.यातून बाहेर पडणं कठीण आहे.मी ही अनेकदा प्रयत्न केला.परंतु ही माझी चूक आहे असं मला सतत भासवून भावनिक होवून पुन्हा यात अडकवण्यात येत.हे समजून देखील मनं संभाळायची म्हणून ऐकून घेते.या इमोशनल ड्रामामधे  घरातल्या बायाच आघाडीवर आहे हं ! 
  असो ! या विषयी किती ही बोललो तरी कमी आहे.परंतु एक गोष्ट या निमित्ताने लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे अमृता बोलल्या नंतर सो कॉल्ड समाजाचे ठेकेदार ती चुकीची आहे बोलायला समोर आले नाही.कारणं त्या त्यांच्यातीलच एक.आपण भटाळलेले बहुजन मात्र पटापट बिळातून बाहेर येवून शहाणपण शिकवू लागलों.
आपला ढोल होतोय जो दोन्ही बाजूने वाजवला जातो.
मागे बिंदी प्रकरण आठवतं का? No bindi no business असं काय तरी सुचलं होत.नंतर हिजाब प्रकरण.तेव्हा ही मी लिहिलं होत.त्यांना जे अपेक्षित असतं आपण तेच करतं असतो.ते मात्र या सगळ्यापासून कोसो दूर असतात.तुमच्यामध्ये त्यांनी रुजवले बुरसटलेले विचार किती मूळ धरून आहेत हे मोजण्याचं हे तंत्र आहे.
समजतंय का? की पुढून पाट मागून सपाट !
  अलंकार घाला घालू नका त्याने फार काही फरक पडत नाही.हो पण आता तरी किमान त्यात कोणाला कैद करून ठेवू नका.स्त्रिया आपल्या मालकीच्या आहेत किंवा ती कोणाची तरी मालमत्ता आहे हे सांगण्याचं हे साधनं आहे.आता या विचारांमध्ये बदल व्हायला हवा.वेगवेगळे अलंकार विशेष मंगळसूत्र घालून आम्ही स्त्रिया नटतो खरं,पण तो दागिना आमचं बंधन,बेड्या होवू देवू नका इतकंच !
  या निमिताने अमृता फडणवीस यांचे आभार मानायला हवेत.इतका जटील विषय त्यांनी हसत हसत सोडवला.
आता त्यातला मतीत अर्थ आपण सगळे समजून घ्या म्हणजे झालं.इथे स्त्रियांप्रमाणे पुरुषांना ही मंगळसूत्रासारखा दागिना घाला असं मी अजिबात म्हणणार नाही.हो पण हौस असेल,त्यांनी घातला तरी हरकत नाही बरं का ! 😃

-प्राची

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??