जागतिक कुटुंबं दिन

कुटुंबं रक्ताच्या नात्यांचं असतं असं जर कोणी म्हणतं असेल तर मला वाटतं ते पूर्णतः बरोबर आहे असं म्हणतात येणार नाही.म्हणायला कुटुंबं दोन,चार,दहा
माणसांचं असतं.परंतु त्याची व्यपकता ही वैश्विक आहे.
"वसुधैव कुटुम्बकम" या विचाराने या वसुधेवर म्हणजे पृथ्वीवर असणारे सर्वंच सजीव आपले कुटुंबीय आहेत.
होय ! सर्वंच सजीव.तुकाराम महाराजांच्या अभांगातील या ओळी सतत आपल्याला आपलं कुटुंबं किती व्यापक आहे हेच दर्शवतात.
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ।।
हा अनुभव तर आपण घेतोच.पण सजीवांमध्ये इतर मानवांशी आपलं नात कसं जोडलं जात ही गंम्मतच आहे.
   या सगळ्याचा प्रत्यय सामाजिक जीवनात विविध क्षेत्रांमध्ये कार्य करताना अनेकदा येत असतो.आपल्या विचाराने,लेखणीने,कार्यामुळे सर्व स्थरातील मानवांची नाळ जोडली जाते हे अनुभव रोमांच निर्माण करतात.
कधी काळी ज्ञात नसणारी मंडळी काळाच्या ओघात कोण बाबा आई दादा ताई वहिनी मामा काका मावशी आजी आजोबा कसे होऊन जातात हे समजून सांगण्या पलीकडे आहे.या सगळ्यामध्ये आणखीन एक नात असतं ते म्हणजे मैत्रीच ! या नात्यात विश्वातील सगळ्या  नात्यांचा अर्क असतो(तसेच,प्रत्येक नात्यात मैत्री असेल तर? असा प्रश्न ही निर्माण होतो).अशाच या मैत्रीच्या नात्यांना बहर येत जातो,कुटुंबं व्यापक होत रहातं आणि आपण अधिक अधिक समृद्ध होतो.ही व्यापकता अंगिकारण्याची प्रगल्भता मात्र समजून घेवून स्वीकारायला हवी.अर्थात हे होण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणं आवश्यक आहे.या विषयी आपल्यात प्रगल्भता आहे तशी समोरच्यांना ही असावी.
नाही तर विश्वाला एका कुटुंबात गुंफण्याचे विचार प्रत्यक्षात उतरण्याचे कार्य अधिक दुरावले.म्हणून यावर ही थोडा विचार करा.कारणं सुख दुःखात आपली म्हणणारी माणसं खुप असतात.थोडं आपण दोन पाऊल पुढे येण्याची तेवढी सवय ठेवा.
   दूर एखाद्या अनोळख्या देशी असलेल्या व्यक्तीचे दुःख बघून डोळ्यांत चटकन पाणी येत.तसंच एखाद निरागस मुलं शेजारच्या बाकावर आईच्या कडेवरून आपल्याकडे पाहून खळखळून हसत आणि आपल्या ही चेहऱ्यावर हसू उमटत.हिचं तर न कळत जोडलेल्या नात्यांची दुनिया असते.माणसं जोडत रहा ! 
 ह्या ओघवत्या भावना आज पर्यंत जोडल्या गेलेल्या
व जोडू पहाणाऱ्यांना सर्व कुटुंबियांना समर्पित..
  आजच्या जागतिक कुटुंबं दिनानिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा !

- प्राची
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??