शंभु स्मृति
११ मार्च
स्वराज्यरक्षक,बुधभूषणकार,स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मृतिदिन..
औरंगजेबाने शंभूराजे यांच्या समोर जिवाच्या बदल्यात स्वराज्याचा सौदा केला होता.पण स्वराज्याच्या मातीशी अन माणसांशी बेईमानी करेल तो शिवाचा छावा शंभू कसा..
तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.आपले लोकशाही,स्वातंत्र्य,अधिकार,हक्क, समानता अशी बहुमूल्ये असलेले स्वराज्य अबाधित रहावं म्हणून शंभू राजे वेदनेच्या असहाय्य आघाताचे घाव सोसत राहिले.आपल्या येणाऱ्या पिढ्या या गुलामगिरी,विषमता,हुकूमशाही,अन्याया सारख्या घातक अमान्य मूल्यंविरुद्ध लढा सतत तेवत ठेवतील अशी आशा व इच्छा मनी या आपल्या राजानं अखेरच्या श्वासापर्यंत बाळगली असेल !
ज्या स्वराज्याच्या रक्षणाखातर त्यांनी आपले प्राण अर्पिले.आपल्या माती व माणसांसाठी जे अमर जाहले.
ते स्वराज्य आज कोणाच्या हाती आहे? केवळ छत्रपतींच नाव घेवून ते मुगलांविरुद्ध होते भासवून धार्मिक तेढ निर्माण करायचा,दुसरीकडे त्यांची सतत बदनामी करायची आणि हिंदुत्वाच्या नावावर आपलं बस्तान मांडायचं.तुम्ही या अशा नीच मनुवृत्तीच्या मूठभर लोकांचे गुलाम झाला आहात.स्वराज्यासाठी आपला देह त्यागलेल्या शंभू राजेंचा हा अवमान आहे.आपली चूक सुधारता येते का बघा..गुलाम होऊन पारतंत्र्यात खितपत पडण्या आधी जागे व्हा.छत्रपती शंभू राजे सर्वांना बळ देवो !
माझ्या धाकल्या धन्याला स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम व शिवाभिवादन !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment