आद्य माता पिता शिव पार्वती
आद्य माता-पिता शिव पार्वती(महाशिवरात्री निमित्त)
सिंधू संस्कृतीचे आद्य पुरुष(पिता) शिव आणि आद्य स्त्री(माता)पार्वती हे बहुजनांचे आदर स्थान.शिव पार्वती हे भारताच्या प्राचीन संस्कृतीतील अतिशय गुणसंपन्न असे दांपत्य होते.ते तुमच्या माझासारखेच हाडामासाचे मानव होते.यज्ञ संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती पूर्वी हे दांपत्या आपल्या मुळ भारतीयांचे लोकप्रिय पूर्वज होते.सिंधू संस्कृतीचे जे अवशेष सापडले आहेत त्यात याचे पुरावे आहेत.कालांतराने वैदिकांनी नेहमीप्रमाणे शिव पार्वती यांची लोकप्रियता लक्षात घेता आपल्या या आद्य गण माता-पित्याचे स्वरूप बदलून त्यांना आपलेसे करून त्यांचे दैवीकरण केले.
पराक्रमी,कर्तृत्वान,कुशल,निष्कपट,संविभागी,दयाशील, भावनिक,तत्पर,लोककल्याणकारी,संरक्षक,बलशाली अशा असंख्य गुणांनी युक्त शिव पार्वती होते.
कृषक व त्याचं बरोबर पशुपालक संस्कृतीशी असलेला निकटचा संबंध त्यांना आपल्या पूर्वज स्वरूपात दर्शवतात.त्यांच्या संदर्भात रचलेले पोथी,पुराणं, कथा,मिथक यातून जर अतिशयोक्ती असलेला भाग वगळला तर त्यातून आपण याविषयी अधिक बोध घेवू शकतो.बऱ्याच गोष्टी त्यांचे कल्याणकारी कार्य झाकण्या हेतूने चमत्कार स्वरूप दाखवण्यात आले आहे.
शिवाचे गण हे राक्षक दाखवले आहेत.म्हणजेच भारतातील मूळ जनता ही राक्षस,दानव,असुर अशी वैदिकांनी संबोधली आहे.हेच सर्व शिवाची प्रजा होते.भूत,पिशाच्चं,खैस,हडळ शिवाचं सैन्य होत.याचा अर्थ खरच अस काही अमानवी,दैवी शक्तीनंमुळे वगरे काही होत अस नाही.हे आपल्या पूर्वजांना उपहासात्मक,द्वेषाने दिलेली नाव आहेत.राक्षस म्हणजे रक्षक.रक्षा करणारे.आपले पूर्वज पराक्रमी होते.त्यांचा गौरवशाली इतिहास वैदिकांनी नेहमी भेसळ करून,खोटा रचला आणि तो मलीन करण्यात यशस्वी झाले.आज ही आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पहातो. किती कुटीलपणे हे मलीन करत आहेत.अर्थात आज आपण जागृत आहोत.पण आपले पूर्वज भोळे होते. अगदी शिवाचं वर्णन करतात तसे.त्यांना आपल्या पूर्वजांचे दैवीकरण होत असलेले समजलं नाही.
किमान आपण तरी ते समजून घ्याल ही आशा आहे.
बळी राजा,रावण,जलंधर असे अनेक असुर राजे शिवाचे वंशज होते.शिवासह या सर्वांनी वैदिक यज्ञ संस्कृतीला विरोध केला होता.याचे अनेक पुरावे आहेत जे अभ्यासपूर्ण डॉ.आ.ह.साळुंखे तात्या यांनी आपल्या बळीवंश या पुस्तकात मांडले आहेत.नेहमीप्रमाणे वैदिकांना ज्या आपल्या पूर्वजांना बदनाम करता आले नाही त्यांना आपलंस करून त्यांचं दैवीकरण यांनी केलं.
शिव पार्वती असेच आपले आद्य पूर्वज.आता हे काही अंशी समजलं असे तर आपल्या या पूर्वजांचे मानवी रूप स्वीकारून त्यांचे त्या स्वरूपात स्मरण व्हावं इतकीच अपेक्षा आपल्या सर्वांकडून आहे.
आज महाशिवरात्र आहे.शिवाचे दैवी रूप,जे खोटं आहे ते पुजण्याचे प्रकार होतात.दूध,दही,तूप घालून अभिषेक केला जाईल.त्याच्या नावाने उपवास केले जातील.काही नवस ही होतील.भक्तिभावाने शंकर डोक्यावर घेतील.
त्याची स्तुती गातील.अनावश्यक सर्व काही होईल.
पण आपल्या या पूर्वजाला समजून मात्र घेणार नाहीत.
त्याचा सत्य आदर्श मात्र घेणार नाहीत.
ज्ञान असून देखील आपण अज्ञानी राहिलो,
कारणं अध्यात्मात आपण अधिक गुंतलो.
विज्ञानावर आपण अध्यात्म पोसतोय,
म्हणून तर आपण अज्ञानात जगतोय.
आज महाशिवरात्री निमित्त माझ्या या कर्तृत्वशाली,लोककल्याणकारी मानवी
आद्य माता-पिता शिव पार्वतीस मनःपूर्वक अभिवादन !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
उत्तम लेख . यातील आशय नितांत महत्त्वाचा आहे.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान लेख आहे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteधन्यवाद
ReplyDelete