ऐसा राजा होणे नाही
मानवतेचा व लोककल्याणाचा पाया रचिला,
स्वराज्य ते अवघे उभारण्याला.
रयतेला सुराज्य केले हो बहाल,
असा हा अद्वितीय राजा या मातीत जन्मला.
सांगे प्राची सर्वा तळमळीने,
जनहो तुम्ही निरखूनी ऐका.
शिवराय जयाचे नाव,
कर्तृत्व त्याचे भाव विभोर.
ऐसा राजा पुन्हा होणे नाही,
तरी जतन करा तैसे विचार.
तेच करतील तुम्हा आम्हा संकटपार,
बाकी सर्व अंधकार.
स्वराज्य संस्थापक,बहुजन प्रतिपालक,
लोककल्याणकारी जाणता
राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🚩🚩
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment