शिवजयंती
शिवजयंती
१९ फेब्रुवारी २०२२,३९२ वी शिवजयंती.
तुम्ही शिवजयंती कशी साजरी करणारं आहात?
मनापासून करणारं..अस म्हणणारे खुप भेटतील.
पण,शिवजयंती मनापासून साजरी करायची आहे ?
तर त्याची सुरुवात मात्र तुमच्या बुद्धीपासून झाली पाहिजे !
घराघरात शिवजयंती म्हणजे शिवरायांच्या प्रतिमेपुढ
हार,तुरे,फुलं,दिवाबत्ती नाही,तर परिवर्तनवादी विचारांची मशाल पेटवणं होय !
खबरदार जर छत्रपती शिवाजी महाराजांना
हिंदुत्ववादी म्हणाल.सनातनी,मनुवादी सडक्या मेंदूतून शिवराय व स्वराज्या विरुद्ध असलेली पोटशूळ आहे ही.
त्यांच्या संघर्षाचा,कर्तृत्वाचा, इतिहासाचा अपमान त्यांच्या खोट्या इतिहासचे दाखले देत केला तर तुम्ही खरे स्वराज्य द्रोही आहात हे लक्षात घ्या.खरा इतिहास माहीत नसेल,तर तो समजून घ्या.पण संघोट्याच्या खोट्या इतिहासाचे पुरस्कृतकर्ते,प्रचारक व प्रसारक होवू नका.
तुमच्या क्षणभराच्या सुखासाठी,फायद्यासाठी,स्वार्थापायी
छत्रपतींना व स्वराज्याला बदनाम करू नका.
निधड्या छातीने कोणत्या ही संघर्षाला धाडसानं सामोरं जाण्याच बळ आपल्या राजानं आपल्याला दिल आहे. गुलामीपासून मुक्ती,स्वातंत्र्य,न्याय,सन्मान,हक्क, अधिकार,बंधुता इत्यादी मूल्य बहाल करून,
मानव म्हणून जगण्याचे स्वप्न प्रत्यक्षात स्वराज्याच्या थोरल्या धन्यानं आपल्यात निर्माण केलं.छत्रपतींच्या परिवर्तनवादी इतिहासाचे दाखले देत व घेत आपण इथवर आलो.खोटेपणा व दिखावा करून त्यांचा अवमान करू नका.
खोट्या इतिहासाचे दाखले देवून देखील छत्रपतींच थोरपण सनातन्यांना पूर्णतः नष्ट करता आलं नाही.
पण,तरी ही त्यांनी आपल्या कुटील कारावाया बंद
केलेल्या नाही.जराशी सापट मिळाली की हे त्यांच्या गलिछ विचारांची मळमळ बाहेर काढतात.छत्रपती शिवरायांच्या खोट्या इतिहासाचा गैरवापर करून आपापल्यातच युद्ध पेटवून देतात.शिवरायांच्या स्वराज्याचा पाया वैचारिक कृतिशील परिवर्तनाचा होता.
यात रयतेचा सहभाग अखंड व अमूल्य होता.रयत म्हणजे सर्वसामान्य जनता.मग कोणत्या ही भेदभावाविना यात सगळेच आले.म्हणून स्वराज्य हे रयतेचं राज्य होत.
राजा हा प्रजेचा मालक नाही तर कुटुंबप्रमुख असतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल आहे.तरी हे सनातनी त्यांना गोब्राह्मण प्रतिपालक,हिंदुत्ववादी,हिंदवी स्वराज्य,दैवत,देऊळ, आरती अशा शब्दांचा प्रयोग करून त्यांच्या प्रती विशिष्ट विचारांमध्ये,घटकांमध्ये वर्चस्ववाद निर्माण करतात.
एक तर त्यांना आपल्या पद्धतीने मिरवतात नाही तर त्यांना देवत्व बहाल करतात.या पद्धतीने महानायकांना कैद करून ठेवण्याचे पातक या सनातन्यांच्या विचाराने आपण देखील करत आहोत.
हे सगळं रोखलं पाहिजे.यासाठी स्वतःला स्वराज्याचे व छत्रपतींचे मावळे,वैचारिक वारस म्हणणाऱयांनी सत्य इतिहास समजून ते विचार कृतिशीलपणे आपल्या आचरणात उतरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
कुटुंबात,समाजात या सत्य इतिहासाचा प्रचार व प्रसार केला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज व सर्वच महानायक महानायिका यांचा कर्तृत्वशाली इतिहास जतन करून तो पुढच्या पिढी पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.आज आई,वडील,शिक्षक,शिक्षिका जे मुलांचे-विध्यार्थ्याचें गुरु स्थानी असतात ते देखील चुकीचा व खोटा इतिहास मुलांना आवडीने सांगतात.
सामाजिक व राजकीय क्रांती निर्माण करणाऱ्या, सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक,राजकीय इत्यादी दहशतवाद ठेचनाऱ्या व मानवहित,समाजहित जोपासणाऱ्या राजाला आपणच जाणते-अजाणतेपणे एककल्ली चित्रित करून पुढच्या पीढी समोर सादर करतो.
शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, कर्तृत्वाच्या,हिमतीच्या,धाडसाच्या आणि रयतेच्या विश्वासाच्या व साथीच्या जोरावर स्वराज्य असलेले राष्ट्र उभं केलं.या स्वराज्यात लोकशाही नांदत होती.
हे राज्य सार्वभौम होते.हा राजा व त्याचे राज्य संविभागी होते.तो स्त्री सन्मानाचा पुरस्कृतकर्ता होता.बळीराजा प्रती आदर,सन्मान,आपुलकी व काळजी त्याला होती.
त्याचे छत्रपती पद हे देखील रयतेला समर्पित होते.
शत्रूला देखील ज्याच्या विचार व कृतीवर विश्वास होता.
त्याचा नक्की कोणता इतिहास आपण पचवतोय याचा थोडा तरी विचार या राजाच्या जयंती निमित्त तरी करा.
बुद्धी गहाण ठेवून अहंपणे बुद्धिमत्तेच्या गप्पा मारण,इतकं गहाळपण काय कामाचं.नाशाकडे घेवून जाणाऱ्या या अहंपणाचा त्याग करा आणि देदीप्यमान
असा आपल्या थोरल्या धन्याचा खरा इतिहास जो समाजाला जोडणारा धागा आहे.लोककल्याणकारी आहे.
त्याचे पुरस्कृतकर्ते व्हा..
लक्षात ठेवा,महात्मा फुले नसते तर या सनातन्यांनी शिवराय व त्यांच्या स्वराज्याचा इतिहास केव्हाच पुसला असता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेवून,त्यांच्यावर पोवाडा लिहून सार्वजनिक शिवजयंती करण्यास सुरुवात केली म्हणून आपण आज हा इतिहास समजू शकलो.छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास,त्यांचे विचार व कार्य जनाजना पर्यंत पोचावं या उद्देशाने शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरु केली होती.
याचा विसर पडू नये हिचं अपेक्षा.इतिहासाकडून शिकायचं असतं.काय केलं पाहिजे व काय चुका करू नये याचा आलेख म्हणजे इतिहास ! समजलं तर ठीक..
तरच मनामनात शिवराय व घरा घरात शिवजयंती हे चित्र प्रत्यक्षात उतरेल.नाही तर नुसतंच पालथ्या घड्यावर पाणी..मी दिखावा नाही,वैचारिक शिवजयंती साजरी करत आहे.तुम्ही काय करताय ? कळवा..
रयतेच्या जाणत्या राजाला..छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्मोउत्सवानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा !🙏🚩
बहुजन प्रतिपालक,लोककल्याणकारी राजा
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩
आपल्या सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या शिवमय शुभेच्छा !
जय शिवराय
जय भारत
प्राची दुधाने
वैचारिक कृतिशील वारस..
(वारसा सोशल फाऊंडेशन)
Comments
Post a Comment