महात्मा जोतिबा फुले
दि.२८ नोव्हेंबर थोर समाजसुधारक,विचारवंत,
स्त्री शिक्षणाचे प्रणेते,शेतकऱ्यांचे कैवारी,सत्यशोधक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन !
समाज पुढारला असेल पण सुधारला नाही..जर खर्या अर्थाने हा समाज परिवर्तनाकडे घेऊन जायचा असेल तर आज ही महात्मा फुले यांचे आचार विचार आपण अंगीकारणे व समाजातील प्रत्येक घटकात पेरणे आवश्यक आहे.नुसतं अभिवादन आणि हार तुरे वाहण्यापेक्षा त्यांचे वैचारिक वारस होऊन त्यांचे विचार प्रवाहात स्वतःला वाहून घेणे जास्त वंदनीय ठरेल असं मला वाटत !
"कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीयभेद ही निर्मिती मानवाचीच आहे"।
हे विचार मांडणारे थोर विचारवंत,समाजसुधारक,लेखक,शिक्षक,तात्विक व्यक्तिमत्व,शिवजयंतीचे जनक म्हणजेच,
'महात्मा फुले'! 🚩🙏
आज २८ नवेंबर महात्मा फुले यांचा समृति दिन !
या निमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती -
पूर्ण नाव- जोतीराव गोविंदराव फुले
जन्म-११ एप्रिल १८२७,
केटगुण,सातारा.
मृत्यू-२८ नवेंबर १८९०
विशेष कार्य-
-महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणा करण्यासाठी खर्च केले.
-विशेषतः शेतकरी व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली.
-पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण देवून भारतातील पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्या बनल्या.
-स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व स्वतंत्रपणे स्त्रियांसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय.
-अस्पृश्यांसाठी पुण्यात शाळा स्थापन केली.
**नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे**
-हे मानणारे महात्मा फुले यांनी समाजातील विषमता दूर करण्यासाठी व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोचवण्याचे ध्येय होते.
**ह्या ध्येय पूर्तिसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापन केली.**
**सर्वसाक्षी जगत्पती ।
त्याला नकोच मध्यस्थी ॥**
सत्यशोधक चे हे घोष वाक्य !
-महात्मा फुले हे जातीयभेद व चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करत.
-गुलामगिरी विरोधात आवाज उठवला.
-सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
-सत्यशोधकच्या स्त्री विभागाचे नेत्रुत्व सावित्रीबाई यांनी केले.त्यांच्याबरोबर १९ महिलांनी कार्य सुरू केले.
-लेखनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांची व्यथा व दारिद्र्य त्यांनी मांडले.
-लेखनाद्वारे त्यांचे क्रांतिकारी विचार दिसून आले.
-**सत्यशोधक पद्धतीने म्हणजेच पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात महात्मा फुले यांनी
केली.**
**छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून बामणांचा विरोध होवून देखील त्याला भीक न घालता प्रथम शिव जयंती साजरी करणारे शिव जयंतीचे जनक महात्मा फुले आहेत.**
**शिवरायांवर प्रथम पोवाडा लिहून त्याद्वारे त्यांचा समृद्ध इतिहास पुन्हा मांडणारे महात्मा फुले.**
**गुलामगिरी,शेतकऱयांचा असुड या सारखे ग्रंथ निर्माण करून सर्वसामान्य,शेतकरी,कष्टकरी यांच्यावरील होणाऱ्या अन्यायला वाचा फोडणारे महात्मा फुले.**
-**महात्मा फुले यांच्या कार्याला सनातन्यांनकडून सतत विरोध होत.पण ह्या विरोधाला नजुमानता महात्मा फुलेंनी आपले कार्य अखंडित पार पाडले.**
अशा ह्या युग पुरुषाला,हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला
मनापासून शिववंदन !
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महात्मा फुले यांना स्मृति दिनानिमित्त त्रिवार
शिवाभिवाद्न !🙏🙏
ll सत्य की जय हो ll
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment