कर्मवीर भाऊराव पाटील

काही मानव खरच थोर असतात.संपूर्ण समाजहितासाठी आपलं आयुष्य संघर्षमय व्यथित करतात.कर्मवीर भाऊराव पाटील असेच एक महा मानव !
कर्मवीरांचा जन्म कोल्हापूर येथील कुंभोज या गावचा.त्यांचे मूळ गाव सांगली येथील ऐतवडे बुद्रुक.
भाऊराव हे लहानपणापासुन बंडखोर होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले.पुढेचे शिक्षण घेण्यासाठी ते कोल्हापूरला राजाराम हाइस्कूलमधे   दाखल झाले.ह्या काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा व अभूतपूर्व कार्याचा प्रभाव पडला.शाहू महाराजांकडून कार्य करण्याची प्रेरणा भाऊराव यांना मिळाली.सुरुवातीला आपल्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर दूधगाव येथे दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले. सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी वस्तीगृह ही येथे स्थापन केले.रयत शिक्षण संस्थेची बीज खरं तर  इथेच रोवली गेली.मी या शिक्षण संस्थेची काही काळ विध्यार्थीनी होते याचा सार्थ अभिमान आहे.
पुढे ४ ऑक्टोबर १९१९ रोजी कोल्हापूर येथील काले ह्या गावी कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.मागासलेल्या,वंचीत  समाजातील मुलांना शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण,अनावश्यक रुढी परंपरांना फाटा देणं,प्रेमभाव व बंधुभाव निर्माण करण,संघटनशक्तिच महत्व पटवून देणं आणि मुख्य म्हणजे बहुजनांना मोफत शिक्षण देणं हे कार्य रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी समर्थपणे पार पाडल.त्यांच्या ह्या कार्यामधे त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचा की फार मोलाचा वाटा होता. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला.१९५९ साली पुणे विध्यापिठाने त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली.बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञान गंगा पोचवणार्या ह्या आधुनिक भागिरथीची प्राण ज्योत ९ मे १९५९ रोजी मावळली ! काही व्यक्ति अस काही अभूतपूर्व कर्म करून जातात की त्यांचे कर्तुत्व त्याची साक्ष भविष्यात ही देत रहातात.अशाच कर्म करणाऱ्या वीराला म्हणजेच पद्मभुषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना आज ९ मे 
स्मृति दिनानिमित्त विनम्र शिवाभिवादन !

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाउंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??