राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज
घाटगे कुटुंबातील अवघ्या १० वर्षांच्या यशवंतला,चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले.यशवंताच नाव शाहू ठेवण्यात आलं.पुढील काही वर्ष शाहूंचे शिक्षण, प्रशिक्षण सुरू राहिले.शिक्षण सुरु असताना वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याबरोबर झाला.
पुढे शाहू हे छत्रपती शाहू महाराज झाले.आपल्या रयते प्रती त्यांना कणव होती.त्यांच्या प्रत्येक कार्यातून ही कणव दिसून येतं.बहुजनांसाठी शैक्षणिक कार्य,स्त्रीसन्मानासाठी अनेक ठोस कार्य,जातीयभेद- व्यवस्थेला दुबळ करणारे,सत्यशोधक समाजाचे कार्य,स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग,शेतीला आधुनिकतेची जोड देणारे शेतकऱ्यांचे कैवारी,मूलभूत अधिकारांपासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण,नौकरी,व्यवसाय हे मार्ग खुले करून समाजात सन्मानाचे स्थान देणारे,आरक्षणाचे जनक,आपल्या करवीर संस्थानात स्वातंत्र्यापूर्वी समता,बंधुता,धर्मनिरपेक्षता अंमलात आणणारे,सर्व घटकांना न्याय मिळवून देणारे,राजांचे राजा,लोककल्याणकारी राजा,जाणता राजा,राजर्षी अशा अनेक उपाधी आपल्या दूरदृष्टीच्या, कार्याच्या व कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण करणारे,छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक,कृतिशील वारसा पुढे चालवणारे
छत्रपती राजर्षी शाहू महाराज !
असा राजा पुन्हा होणे नाही..
अशा या माझ्या राजाला ६ मे स्मृतिदिनी विनम्र शिवाभिवादन !
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो 🙏🚩
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment