छत्रपती शंभूराजे
आज दि.१४ मे
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव दिन
अवघे ३२ वर्ष आयुष्य लाभलेले सूर्याहून ही तेजस्वी....
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्वांगाने शोभतील असे उत्तराधिकारी,एकपत्नि,भूमिपुत्रांच्या ह्क्कासाठी लढणारे,लोकराजे,सत्यप्रिय,न्यायप्रिय,धर्मनिरपेक्ष,
रणझुंजार,कर्तव्यदक्ष,उत्तम साहित्यिक,कुशल नेत्रुत्व,निर्भीड व अचूक निर्णय क्षमता,कर्तुत्वसंपन्न, शूर,पराक्रमी,राजनीतिज्ञ,
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
जगातील सर्वोत्तम पुत्र,पती,शासक,राजा ही ओळख आपल्या विचार व कृतीतून निर्माण करणारे शंभूराजे.
शंभूराजे लहान असतानाच,आई सईबाई यांचे निधन झाले.धाराऊ या दूध आईच्या दुधावर ते मोठे झाले. जिजाऊंनी जसं शिवरायांना वाढवले,तसेच शंभूराजेंवर देखील संस्कार करून स्वराज्याला दुसरे छत्रपती दिले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मोहिमांमधे बाल शंभूराजे सोबत असत.अनेक संकटांना सामोरं ही जावं लागतं.त्यांनी कोवळ्या वयात स्वराज्यासाठी सोसलेले घाव फार मोठे होते.लहान वयातच राज्यकारभाराचे ज्ञान शंभूराजेंना अवगत झाले होते. शंभूराजे सर्वांगाने तरबेज होते.
पुढे छ.शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर,अनेक कौटुंबिक व राजकीय विरोधी कारवायांना शंभुराजेंना सामोरं जावं लागलं.विरोधी कारवाया काही थांबल्या नाहीत.अखेर अशाच स्थितीत संभाजी राजे यांनी आपल्या राज्यकारभाराला सुरुवात केली.त्यातून मार्गकाढून संभाजीराजे छत्रपती झाले.
आपली पत्नी महाराणी येसूबाई या छत्रपती संभाजी महाराज यांच्या उपस्थितीत व अनुपस्थित राज्य कारभार खुबीनं,कुशलतेने व दक्षतेने चालवत.त्या छत्रपती शंभू राजे यांच्या अनुपस्थितीत राजपत्रे ही काढत असत.
'श्री सखी राज्ञी जयति" हे वाक्य कोरलेली मुद्रा देखील येसूबाई चलनात वापरत,जी संभाजीराजेंनी त्यांना करून दिली होती.यावरून त्यांची स्त्री सन्मान,समानता व आपल्या पत्नी विषयीचे प्रेम व आदर हे भाव दिसून येतात.
छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण प्रजेसाठी आदर्श राजा होते.पण,कपटाने त्यांना कैद करून औरंगजेबाने हाल हाल करून त्यांना अखेर वेदनापूर्ण मरणं दिल. आपल्या रयतेसाठी,स्वराज्यासाठी शंभूराजांनी जे बलिदान दिल ते शब्दात मांडा येणार नाही.शंभूराजेंनी असंख्य मरणयातना होवून देखील औरंगजेबापुढे गुढघे टेकले नाहीत.आपल्या जीवात जीव असे पर्यंत,रुधिराचा शेवटचा थेंब देखील या मातीसाठी,इथल्या रयतेसाठी, स्वराज्यासाठी त्यांनी वाहिला.जवळ जवळ सव्वशे लढाया लढणारे व एकात ही पराभूत न होणारे रयतेचे पराक्रमी राजे शंभू,मृत्यूला ही हसत सामोरं गेले.
अशा या माझ्या धाकल्या धन्याला काळजी काढून दिल तरी त्यांचे ऋण फेडू शकणार नाही.इतकं कर्तृत्वसंपन्न असं हे व्यक्तिमत्व.मला अनेकदा शंभूराजे शिवरायांपेक्षा विशाल भासतात.अर्थात दोघांची तुलना होणे नाही.
पण,भूतकाळात व वर्तमानात देखील छ.संभाजी महाराज व छ.शिवराय यांच्यात तुलना केली गेली.
तुलनेत शंभूराजे यांचं चरित्र मलीन करण्यात आलं. रंगेल,व्यसनाधीन,बदमान असे अनेक रूपं त्यांची रेखाटली गेली जे वास्तव व सत्य नाही.ही केवल सुडापोटी केलेली तर्कशून्य मांडणी आहे.आपण शहानिशा करणं आवश्यक आहे.इतिहास चुकीचे दाखले देवून मलीन करता येतो,बदलता येतो याचा हा पुरावा आहे.
इथे माझा एक अनुभव मी मांडत आहे.जो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे.
काही वर्षांपूर्वी मी माझ्या मुलीला व मुलाला छ.संभाजी महाराज यांचा इतिहास सांगत होते.त्यांची इथे लिहिली आहे त्याचं प्रमाणे मी माहिती सांगत होते.मुलं मन लावून ऐकत व विचार करत होती.शेवटी त्यांचा मलीन केलेला इतिहास सांगत असताना माझ्या तेव्हा वय वर्ष ६ असलेल्या मुलाने(अभिमान)मला मधेच एक प्रश्न विचारला.तो प्रश्न माझ्यासाठी नवीन नव्हता.पण,तो त्याने विचारला म्हणून मी थोडी थबकले.तो प्रश्न साधा सोपा होता.'शंभूराजे इतके मोठे होते(इथे मोठे म्हणजे शूर),खुप लढाई केली आणि सगळी जिंकले.हो ना?'
मी म्हंटल हो.मग जर ते वाईट औषधं घ्यायचे(म्हणजे दारू)तर ते सगळी लढाई कसे जिकंले असते? हा त्याचा प्रामाणिक प्रश्न.हा प्रश्न त्या कोवळ्या जीवाला पडला,पण अनेक बिद्धीवंत समजणार्या प्रौढांना आज ही पडत नाही याची खंत वाटते.त्याला तेव्हा साध्या सोप्या शब्दात समजून सांगण्याचा प्रयत्न मी केला.पण,त्याने संभाजी राजे समजून घेण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न आणखीन सुरूच ठेवावा लागेल हे तेव्हा समजलं.
इतिहासात रमायचं नसतं,पण त्यातून शिकायचं असत..
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ताठ मानेने जगायला शिकवले,तर छत्रपती संभाजी राजे यांनी वेळ प्रसंगी ताठ मानेने आपल्या मातीसाठी कसे मरावे हे त्यांनी दिलेल्या बलिदानातून दाखवून दिले.
अशा माझ्या ह्या धाकल्या धन्याला जन्मोउत्सव निमित्त कोटी कोटी शिवप्रणाम !!
🚩🚩🚩🚩🚩
॥ जय शहाजीराजे ॥
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभुराजे ॥
🚩🚩🚩🚩🚩
प्राची दुधाने
वारसा फाउंडेशन,पुणे
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जन्मोउत्सवा निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏🚩
ReplyDelete