पाऊस

पाऊस 

तपत्या धरणीवर पडतो पावसाचा थेंब जेव्हा,  आठवणींच्या गंधाला येते उधाण तेव्हा.

भरदिवसा काळोख भासू लागतो,
तेव्हा संध्याकाळचा दिवा दिवसा तेवू पहातो.

सैरभैर पाखरं नभात फिरू लागतात,
अचानकपणे गाठलेल्या संकटाला तोंड देतात.

कुठं वाहिलं घर त्या काऊच,
तर कुठं काळीज फाटले चिऊचं.

बरसला बिन वेळेचा हातभर, 
पाणी वावरात बळीच्या वीतभर.

सारी सारी दुनिया आडोसा शोधतीया,
बरसनाऱ्या मेघाला आवरा म्हणतीया.

कधी हवासा कधी नकोसा,
हा बरसतो कधी पण कसा ?

पडला तरी ताप,
नाय पडला तरी दुःख अमाप.

निसर्गाच्या पुढे मानव झाला गप,
आले अन गेले कैक तप.

आजही तो असाच बरसला,
येता जाता सारा गोंधळ माजवून गेला.

किलबिल पाखरांची, 
तर कुठं लगबग माणसांची.

एवढ्यात,कोण म्हणतो आपल्याला काय,
घोटभर चहा अन भजी करते काय..!!?? 

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??