महिला दिन विशेष आज सगळ्यांना सुट्टी होती. सकाळचा नास्ता घरातील सगळे एकत्र करणार, म्हणून 'ती' सकाळीच स्वयंपाक घरात शिरून कामाला लागली. प्रत्येकाची वेगळी फर्माईश होती. एकदाचे सगळे टेबलावर एकत्र जमले. तोच वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. विषय वाढता वाढता इतका वाढला कि घरासाठी आपण किती करतो हे प्रत्येक जन मोठमोठ्या आवाजात सिद्ध करू लागला. 'ती' मात्र सर्व शांतपणे न्याहाळत प्रत्येकासाठी बनवलेला पदार्थ समोर वाढत होती. मिश्किल हसत आता बास, खाऊन घ्या म्हणतं तीन सगळे पदार्थ थोडे थोडे आपल्या ताटात वाढून घेतले. काही समजलं का? आज जागतिक महिला दिन साजरा करतं आहोत ना !? जगातील महिलांची स्थिती काय आहे हे सर्वश्रुत आहे. तिला आज ही मानव म्हणून आपलं स्थान मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंबहुना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतं आहे. तरी ही असंख्य 'ती' हा लढा घरापासून ते समाजामध्ये अनेक क्षेत्रात कार्य करतं असताना धीरानं लढत आहेत. त्यांचा हा लढा मानसिक खच्चीकरणाद्वारे अधिक होतो. विनाकारण स्पर्धा व द्वेष करणाऱ्या इतर महिला, ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे वासनां...
भाऊ बीज बहीण आणि भाऊ या नात्यांना एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणा मिथकाची आवश्यकता नाही.बहीण भावाचं नातं म्हणजे एका बीजातून अंकुरलेला अन मायेची सावली निर्माण करणारा विश्वासाचा वटवृक्ष.आपण मोठे झालो की लहानपण पुन्हा यावं ही आस आयुष्यात एकदा तरी मनाला शिवून जाते.बालपण मजेचं म्हणून ही आठवण असते असं नाही.नात्यांमध्ये स्पष्टपणा,प्रेम,मायेचा ओलावा, निस्वार्थपणा,अल्लडपणा,पारदर्शकता,रुसवे फुगवे, विसरभोळेपणा,आनंद, सुख,आपलेपणा.सगळं कस निर्मळ असत.पण मोठेपण या सगळ्याचा घात करत. मग असं वाटत मोठ झालोच कशाला.पण शेवटी निसर्ग नियम आहे.पण मोठं होताना प्रेम ही मोठं व्हावं याच गाणं लहानपणी शिकलोच नाही.पावसाला मोठं होण्यासाठी पैसा दिला की तो मोठा होतो हे शिकलो,ते धादांत खोटं असलं तरी.पण नात्यांना प्रेम,विश्वास, आपलेपणा देवून मोठं करता येत हे खरं मात्र शिकायला विसरलो. बहीण भावाचं नातं नितळ वहाणाऱ्या झऱ्यासारख असावं.त्यात स्वार्थाचा लवलेश नसावा.बहीणभावाचं हे नातं रक्ताचं असावं असं नाही,पण ते निस्वार्थी असावं. मोठा भाऊ हा पिता समान तर मोठी ताई ही आई समान असते असं म्हणतात.टा...
६ डिसेंबर..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याचा स्मृतिदिन ! लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले,सत्यशोधक, प्रयत्नशील, परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले, उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील.सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले. आज देश स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे.नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणात आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे विच...
Comments
Post a Comment