स्वराज्याचे तिसरे छत्रपती-छत्रपती राजाराम महाराज
राजगड येथे छत्रपती शिवराय यांच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी राजाराम यांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला.
मुल पालथे जन्मल्यामुळे पुरोहित अपशकुन म्हणून कुजबुजू लागले.
राजांनी मात्र “माझा पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले …! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील … !” असे उद्गार काढून अशुभ शंका घेणाऱ्यांचे तोंड कायमचे बंद केले.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने कुशल नेतृत्व केले.छत्रपती राजाराम महाराजांनी
पातशहाला झुंजवत ठेवून यश मिळू दिले नाही,पातशाही खिळखिळी केली.अशा छत्रपती राजाराम महाराजांना जन्मोउत्सव निमित्त त्रिवार मुजरा !🙏🚩
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
Comments
Post a Comment