नामधारी नाही..ती कामधारी !

नामधारी नाही..ती कामधारी !

तिला नुसतं नामधारी होणं कधी जमलंच नाही..
काही तरी धेय्य आयुष्यात निश्चित असावं.त्यासाठी येईल त्या परिस्थितीला सामोरं जावं लागण,संघर्ष करणं हेच जिवंतपणाच लक्षण आहे असं तिला वाटायचे.नुसतं नामधारी असणं किती सोपं असत.पण हे सोपंच कधी तिला जमलंच नाही.
आधी तिला हे सारं कळलंच नाही.खुप विरोध पचवावा लागला.आज ही ती तो विरोध स्लो पॉयझन सारखा पचवत आहे..परक्यांबरोबर आपल्यांचा ही !
हा विरोध आपल्या कर्त्यापणामुळे होतोय,हे जाणून तर तिच्या मेंदूला मुंग्या आल्या.नामधारी न होता वास्तविक कामधारी असणंच तिला त्रासदायक होत गेलं. पुरुषी,बुरसट मानसिकता कुठं आणि किती आपला श्वास,आवाज,जिणं  दाबत आहे हे हळू हळू तिला समजतंय.जीव आकांताने त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी झटतोय.हो ! पण हे सगळं शांततेत चाललंय.तिच्या चेहऱ्यावर हस्य अबाधित आहे. ती सगळी कर्तव्य पार पाडत आहे.मन मात्र सैरभैर होत आहे.चाललेल्या मार्गावर आपलं धेय्य गाठु पर्यंत,वाट किती ही खडतर झाली तरी त्यावर चालत रहाणं.हेच मुळात पहिलं धेय्य तिने बाळगल आहे.
सापाने कात टाकावी तशी ती ही कात टाकत असते.
नैराश्याची,दुःखाची,विझत चाललेल्या स्वप्नांची, मावळत्या आयुष्याची..ती पुन्हा एकदा उभारी घेण्याकरीता सज्ज आहे ! अशीच असते कर्तृत्ववान स्त्रीची कहाणी..

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??