सावरकरी विखारी विचारांशी असलेलं माझं वैर अन लढा !
आज वि.दा.सावरकर या व्यक्तीची पुण्यतिथी. सकाळपासून स्वतःला पोस्ट करण्यापासून रोखलं होत. पण आता मात्र हात शिवशिवायला लागले.म्हणून ही पोस्ट करत आहे.
तस सावरकरच आणि आपलं काही जमत नाही.
स्वतःला स्वातंत्र्यवीर म्हणून घेणारी ही व्यक्ती मुळात देशविरोधी होती.म्हणजे खरी देशद्रोही.आमच्यासारखी देशद्रोही नाही.बरं का ! या माणसाचं विनाकारण उदात्तीकरण झालं व आज ही होत आहे.सावरकरने जे देशविरोधी कुकृत्य केले त्याबद्दल शेवट पर्यंत या माणसाला पश्चात्ताप झाला नाही.आपलं खापर कायम दुसर्यावर फोडल.तुम जावं लढो,हम कपडे संभालते.
ही भूमिका सगळ्यांच्याच बाबतीत या महाशयांनी कायम प्रामाणिकपणे राखली.कोळशाच्या दलालीत हाथ काळे होतात म्हणतात.पण हा बुवा इतकी कांड करून देखील साफ कसा राहीला हाच मोठा प्रश्न.अखंड भारताचं म्हणजे यांच्या भिकार स्वप्नातल्या हिंदुस्थानाच चित्र हे पुण्यस्थळी जाताना देखील सोडून गेले.हा यांच्या स्वप्नातला हिंदुस्थान आधीच इथल्या मातीतल्या लेकरांचे मूडदे पाडून फस्त करून बसलाय.भस्म्या झाल्यासारखा हा अखंड हिंदुस्थानचा अजगर आज ही भोळ्या भाबड्या लेकरांना भुलवून त्यांना गिळंकृत करतोय.हे यांचं पाप !
त्याची कटू,विषारी फळं आपण चाखतोय अन रोज मरतोय.
काही येतील यावर मला अधिकच शहाणपण शिकवायला.आज सावरकरांची पुण्यतिथी.माणूस मेल्यावर तरी वैर नसावं.अस काहीस शिकवतील.
हो ! आहे माझं वैर या सावरकरी विचारांशी.
कारणं,जाता जाता हे आपले विखारी दंश पेरून गेलेत.
त्याचं काय ? जे जे सावरकरचे हे विचार घेवून आज जगतायेत.त्या सर्वांशी माझं वैर आहे आणि शेवट पर्यंत असेल.And I am not sorry for this ! Never..
पण हो,माझी संस्कृती,संस्कार मला प्रत्येकात चांगलं काही तरी बघायला शिकवतात.मी सावरकरचे हे असले भिकार विचार आणि कृती सोडले तर काही अंशी त्यांच्यात असलेले चांगले विचार नक्की स्वागतहार्य मानते.so called हिंदू धर्मातील काही अनावश्यक विचारांवर त्यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.
हे नाही कोणी मांडत.ना सावरकरचे समर्थक,ना विरोधक.
कारणं आपल्या सोयीचे ते वापरायचं.हा फ़ंडा भारी असतो.यामुळेच अशा मेलेल्या माणसाशी असलेलं आमच्यासारख्याशी वैर कायम रहातं ! कारणं त्याचे कुविचार समाजात पोसणारी पिलावळ सतत वळवळत असते.
विज्ञानवादी सावरकर दाखवला नाही आणि दिसला पण नाही.म्हणतात ना,'जे पेरलं तेच उगवलं'.तसंच,
स्वताच्याच निर्माण केलेल्या,द्वेषाने भरलेल्या,दुर्गंधीयुक्त मलाच्या ढिगाऱ्याखाली सावरकर सापडला तो कायमचा !
सावरकर बरोबरच माझं वैर मी जन्मन्यापूर्वीच संपल आहे.पण,सावरकरी विखारी विचारांशी असलेलं माझं वैर,वैचारिक कृतिशील लढ्याच्या रूपाने सुरूच राहिल. ही खात्री आजच्या या दिवशी देते.हेच सावरकरच्य स्मृतिस अर्पण !
प्राची दुधाने
वारसा सोशल फाऊंडेशन
ताई खूपच छान आपले विचार,आहे,माफी विर,तसेच या एका जमातीने स्वकियांनाच लोकमान्य,स्वातंत्र्यवीर बापू, कापू,दादा,आप्पा,स्वामी,बना,या स्वयं घोषित,बिरुदावली लाऊन घेणारे,ही कपोल कल्पित,कथा रचणारे,पाखंडी ही एक जमात स्वतःला एक great समजते आणि आमचा बहुजन समज कोणतीही तर्क वितर्क,n करता पटकन यांच्यावर विश्वास ठेवतो हेच मुळीच मूर्ख पणाचे लक्षण होय
ReplyDeleteवा खूपच छान मार्मिक लेख व त्यातून केलेला उलगडा व उपदेश
शिवश्री:सुभाष गुजर,पनवेल खांदा कॉलनी नवीमुंबई रायगड,,
धन्यवाद दादा
Delete