सरते वर्ष..
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyNSNS0Jm3ySwXp8ag03O5wEgt9gHvpWk1y4caCHAw92OAjddgS0Pemd5l_0jsWNJiJ_J0wZzR89LcR4GNJO6kOJ8Ub2B8vGrcj0or_7MonnkUIAWJkunvxroUfGich6GsN1Tob6qv_XQ/s1600/1609407598672144-0.png)
सरते वर्ष.. २०२० हे वर्ष सुरु होण्यापूर्वीच विश्वावर कोरोना सारख्या जागतिक महामारीचे सावट उभ ठाकलं होतं.संपूर्ण जग एकाच वेळी भयभीत झाल असावा अशी स्थिती. मानवाने कितीही प्रगती केली तरी मृत्यूला तो रोखू शकत नाही.याचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याशिवाय राहत नाही.कोरोना विषाणू मानव निर्मित असल्याचेही समजले.त्यात किती तथ्य माहीत नाही.पण या विषाणूने असंख्य माणसं गमावली हे नाकारून चालणार नाही.२०२० हे वर्ष तस भीतीच्या सावटाखाली गेलं.अजून धोका टळला नाही.पण मानवाने जणू ह्या कोरोनाच अस्तित्व स्वीकारला आहे,अस जगतोय. २०२१ हे वर्ष तरी किमान आशादायी असावा ही माझ्यासारखी अपेक्षा व इच्छा बहुसंख्य लोकांची असावी.या वर्षीचा संकल्प आहे त्यात कसे सुरक्षित राहावं हा विचार व्हावा.सर्वांचे दैनंदिन जीवन किती विस्कळीत झाला आहे याची कल्पनादेखील करवत नाही.नोकऱ्या नाहीत,शाळा असून नसल्यासारखी, मोकळेपणाने कुठं-कुणाकडे जाणं-येणं नाही,मानसिक व शारीरिक ताण,आर्थिक विवंचना,आरोग्य विषयी चिंता अशा अनेक समस्या सोबतीला आहेतच. २०२० या वर्षात अनेक कुटुंबांनी आपला आधार गमावला आहे.काहींनी तर एकापेक्षा जास्त म...