डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाभिवादन !

६ डिसेंबर..डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र शिवाभिवादन !

६ डिसेंबर..बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिन.आज ज्ञान खऱ्या अर्थाने पोरकं झाल असेल.कारण ज्ञान काय असतं व ते कसे संपादन कराव,त्यातून जनकल्याणाचा मार्ग कसा निर्माण करायचा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.आज बाबासाहेबांच्या विषयी अनेक भावना व्यक्त होतील.त्यांच्या बद्दल कितीही लिहिले तरी कमीच.मुळात त्यांनी जे लिहून ठेवला आहे ते समजून घेण्याची सुद्धा आपली अवपत नाही कधी कधी असं वाटतं.कारण आपण बाबासाहेबांचे विचार पूर्णतः कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही.
ते केल पाहिजे.आज बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक छोटासा प्रयत्न,त्यांचे दोन-चार विचार आपल्या समोर मांडून करत आहे.
  बाबासाहेबांचे विचार खूप प्रगल्भ होते.त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास ही दांडगा होता.ते म्हणायचे ज्यांना इतिहास माहीत नाही,ते इतिहास घडवू शकत नाहीत.
हे निश्चितच खरं आहे.इतिहास हा एक मागोवा असतो.
जो आपल्या वर्तमान व भूतकाळ यासाठी मार्गदर्शक ठरतो.अनेक चुका,कर्तुत्व,बदल इत्यादी घटनांचा इतिहास साक्षीदार असतो.ते जाणून घेणं महत्त्वाचं. अर्थातच इतिहास रमण्यासाठी नसतो.तो भलं-बुर शिकवण्यासाठी असतो.त्यातून नवनिर्मिती अपेक्षित आहे.जे बाबासाहेबांनी करून दाखवलं.
   समाजाच्या प्रगतीचे मोजमापन करायचे असल्यास त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती काय या वरून करता येते.स्त्री गुलाम नाही तिला तिचे हक्क,अधिकार माहिती झाले तर ती तुमच्या बरोबरीने उभी राहून तुमची साथ देईल.हे पुरुषांना स्वतःला गौरव करण्याचे कार्य असेल.अस बाबासाहेब म्हणत.स्त्रियांसाठी अनेक कायद्यांमध्ये तरतूद बाबासाहेबांनी करून दिल्या. त्यासाठी त्यांचे सदैव ऋणी राहू.महिला एकत्र असल्याने खरी एकात्मता निर्माण होईल.शिक्षण स्त्रियांना मिळाले तरच ते फलदायी ठरेल.महत्त्वाचं,कोणतेही आंदोलन स्त्रियांच्या सहभागा विना अधुर राहील.असं ही ते म्हणतात.किती व्यापक विचार समाजहितासाठी बाबासाहेबांचे होते हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होते.बाबासाहेब स्त्री सुधारनेचे कट्टर समर्थक व पुरस्कृतकर्ते होते. 
   जो धर्म स्वातंत्र्य,समता व बंधुताची शिकवण देतो तो धर्म मला आवडतो,हे बाबासाहेब मानत.कोणताच धर्म मानवाला मानवाचा शत्रू होण्याची शिकवण देत नाही.स्वतः मानवच चुकीचे समज निर्माण करून समाजामध्ये अराजकता माजत असतो.आपल्या महामानवांचे विचार समजून त्याप्रमाणे विचारांना कृतीची जोड देणे ही काळाची न संपणारी गरज असते.त्याच प्रमाणे बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारून दुरावत चाललेला सामाजिक एकोपा पुन्हा एकसंध करण्यासाठी सर्व वैचारिक वारसांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व थोर विचारवंत,समाजसुधारक,महामानव,वीर-वीरांगना यांचे विचार व कार्य अबाधित राहिले व त्यांना अपेक्षित समाज निर्माण करण्यात हातभार दिला तरच त्यांच्या कार्यास व जीवनात खऱ्या अर्थाने अभिवादन देणे ठरेल. 

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??