Rejected Is Equal To Being Redirected To Something Better..
Rejected Is Equal To Being Redirected To Something Better.. नकार हा सकारात्मकतेकडे घेऊन जाणाऱ्या पुनर्निर्देशका सम आहे. मानवाचे आयुष्य वाटतं,दिसतं तितकं सोपं नाही युगे बदलली,काळ बदलला मानवाने हळूहळू प्रगती केली,पण संघर्ष,प्रयत्न,यश,अपयश यासारखे शब्द मात्र त्याची पाठ सोडत नाहीत.माझ्यामते हेच शब्द कृतीत आले की बदल घडत असतो.हे सगळं होत असताना अनेकदा नकार पदरी पडतो.त्या नकारातून येणारी निराशा मानवाचं जीवन दुःखी व कष्टी बनवत.अनेकदा तर नकारांची मालिकाच सुरू असते.पण मानव देखील हार न मानता पुन्हा प्रयत्न करतो.काही परिस्थितीपुढे हतबल देखील होतात.आपण आज एक समजून घेऊया,नकार हा आपल्या जीवनाचा एखादा चांगला पुनर्निर्देशक(Redirection)ठरू शकतो. नकार आपल्याला आयुष्यात वयाच्या कोणत्याही टप्प्यात येऊ शकतो.नकाराकडे या नकारात्मकतेने बघण्यापेक्षा आपल्याला यापेक्षा चांगल्या गोष्टी, माणसं, जागा,संधी मिळणार आहे हा सकारात्मक विचार करावा. नकार म्हणजे एक जोखीम.ही जोखीम तर आपण पावलो पावली सगळीकडेच झेलत असतो.मग तो नकार कवटाळून ...