Posts

Showing posts with the label Pink Moon

"शब्द काहूर"

Image
"शब्द काहूर" चांद गुलाबी, मंद हवा विरह मज, भासे नवा.. ओढ प्रेमाची अशी, व्याकुळता जीवाची जशी.. मनी सोबतीची आस, अखेर शांत शब्दांसांगे प्रवास.. विरहाच्या शाईने गुंफले शब्द प्रेमाचे, रचनेतून वाहिले काहूर मनाचे.. शोधिला मैफिलीत रे विसावा, एकटीच तरी ही, कसा तुझा हा दुरावा? ओढ न सुटे तुझ्या प्रेमाची, आठवण दाटूनी येता त्या क्षणांची.. भरुनी वाहे ओंझल मज करांची, कहानी अजब अशी या नयनांची... — प्राची