महाराणी भद्रकाली ताराराणीसाहेब स्मृतिदिन !

महाराणी भद्रकाली ताराराणीसाहेब यांचा      
             आज स्मृतिदिन..

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
तत्कालीन कवी यांनी महाराणी ताराराणीसाहेब यांचे जे वर्णन केलं आहे ते निश्चितच त्यांचा लढवय्याबाणा,पराक्रम,कर्तृत्व सिद्ध करण्यास समर्पक आहे.
   आज महापराक्रमी छत्रपती महाराणीसाहेब यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या पराक्रमी जीवनाविषयी मोजक्या शब्दात माहिती(जे थोड अवघड आहे)देण्याचा प्रयत्न करत आहे.

*जन्म-१६७५
*वडील-सरसेनापती हंबीरराव मोहिते (छ.शिवाजी महाराज यांचे सरसेनापती)
*१६८३-८४ दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांच्याबरोबर विवाहबद्ध.
*१६९६ पुत्र प्राप्ती नाव शिवाजी 
*३ मार्च १७००छ.राजाराम महाराज यांचा मृत्यु
*१७०० राज्यभिषेक
*१७०० ते १७०७ कार्यकाळ 
ह्या काळात त्यांनी मोगलांची पळताभुई थोडी अशी अवस्था केली होती.महारानी ताराराणी यांच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्य बळकट झाले होते.
सलग साडेसात वर्ष पराजित न होता मोगलांच्या विरोधात त्या लढत राहिल्या.सैन्यव्यवस्था, राज्यकारभार,आर्थिकधोरण,लढायांची आखणी व चढ़ाई ह्या सर्वांचा आढावा  महाराणी  ताराराणी स्वतः घेत.सर्व लढाया त्या गनिमी काव्याने लढत. जिंकलेल्या प्रांतातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करून स्वराज्याची तिजोरी आर्थिकदृष्ट्या बळकट केली.१७०५ साली मोगलांच्या ताब्यात असलेला पन्हाळा किल्ला जिंकून घेतला.महाराणी ताराराणी साहेब यांचे व्यक्तिमत्व तेजस्वी व तडफदार होते. इतिहासातील असामान्य स्त्री असा त्यांचा उल्लेख निश्चितच होतो व त्याबद्दल अभिमानही वाटतो.लढवय्या,कर्तुत्ववान,विरांगणा महाराणी ताराराणी.दिल्लीचे तख्त हादरवून सोडणारी रणरागिनी.सर्व राज्यकारभार स्वतः जातीने पाहणाऱ्या. एकीकडे शत्रूशी लढा व दुसरीकडे मराठ्यांवर आपला वचक ठेवणाऱ्या महाराणी ताराराणी साहेब. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मोठ्या धैर्याने औरंगजेबाच्या सैन्याशी सामना केला व मुरब्बी सुलतानाला हैराण करून सोडणाऱ्या महाराणी ताराराणी.अखेर औरंगजेबाला मृत्यू आला,पण मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या नंतर खऱ्या अर्थाने छत्रपतींची गादी चालवणाऱ्या कर्तबगार महाराणी ताराराणीसाहेब.
९ डिसेंबर १७६१ सातारा येथे त्यांचा मृत्यु झाला.

अशा या भद्रकाली छत्रपती महारानी ताराराणीसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र शिवाभिवाद्न !

प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??