दिवस एक विश्रांतीचा असावा !
दिवस एक विश्रांतीचा असावा !
धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस
विश्रांतीचा असावा,
थकलेल्या जीवाला काही क्षणांचा
विसावा मिळावा.
दूर लोटून सारे ताप,
असो कितीही व्याप.
ओलांडून कष्टी आयुष्याचे माप,
सुखी क्षणांची देणगी घ्या अमाप.
वरवर अस्थिर अशांत मनाच्या,
खोलवर सुप्त जाणिवा शांततेच्या.
विश्रांती म्हणजे नसे केवळ निद्रा,
हो निरीक्षक स्व विचार अन कृतीचा
ना की कृत्रिमतेचा !
कर मना प्रसन्न घेऊनी विश्रांती,
प्रसन्न मन होईल आयुद्ध तुझे
लढण्या आव्हानांना सम.
आराम घे देहाचा अन मनाचा,
अवलंब एकमेकां एकजुटीचा.
आयुष्य हे धकाधकीचे,
पाण्या सम गढूळलेल्या.
तळ दिसेल तुझं मनुजा,
स्वच्छ ठेविसी जर मना.
स्वस्थ देहाची दवा स्थिर मन,
मिळे विश्रांती जेव्हा त्यास.
निवडलेल्या वाटेवरून फिरू
नको माघारी थकून,
दे विश्रांती जीवाला जरा बसून.
पुढे वाट पाहे तुझी वाट,
पार कर आता ही वाट दाट.
किती जरी क्षण बिकट,
आयु असे असेच चिवट.
तरी..धकाधकीच्या जीवनामध्ये एक दिवस
विश्रांतीचा असावा,
थकलेल्या जीवाला काही क्षणांचा
विसावा मिळावा.
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment