प्रश्न हेच उत्तर

प्रश्न हेच उत्तर 

नेहमीप्रमाणे आई मनीला महामानवांबद्दल माहिती सांगत होती.
बोलता बोलता आई सांगू लागली..
(आई आणि मनी यांचा संवाद)  

आई-आपण चिकित्सक असावं 

मनी-का ?  

आई-कारण चिकित्सेने प्रश्न पडतात 

मनी-कसले प्रश्न ?

आई-कोणती ही अडचण समोर असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी जे आपल्याला उत्तर देतात ते प्रश्न 

मनी-अन जर उत्तर मिळालच नाही तर ?  

आई-मग तर बेस्ट..

मनी-कसं ? 

आई-उत्तर प्रश्नाला प्रश्नच मिळालं तर ते बुद्धीच लक्षण

मनी-त्यानी काय होईल ? 

आई-परिवर्तन 

मनी-कोणाचं ? 

आई-ज्याला प्रश्न पडतात त्याचं,त्याच्या कुटुंबाचं आणि संपूर्ण समाजाचं 

मनी-एवढे प्रश्न कोणाला बर पडले असतील ? 

आई-अग बुद्धांपासून,तुकाराम महाराज,जिजाऊ,शिवराय,शंभू राजे, फुले,शाहू,आंबेडकर,अहिल्या अशा अनेक महामानवांना,समाजसुधारक,विचारवंत,वीर,वीरांगना यांना असे प्रश्न पडले 

मनी-त्याने काय परिवर्तन झालं ? 

आई-लोक शिकले-सवरले,भेदा-भेद कमी झाले अन मानवहिताची कार्य घडली 

मनी-मला जमेल हे परिवर्तन करायला ? 

आई-(आई कौतुकाने मनीकडे भरलेल्या डोळ्यांनी निरखून पहात म्हणाली)जमलं !

मनी-कसं काय ? 

वाचक मित्रमैत्रिणींनो मनीच्या प्रश्नच द्या उत्तर..
आणि तुम्हाला प्रश्न पडतात का ? 
ते ही कळवा.
एक मात्र लक्षात ठेवा, 
उत्तर अपेक्षित असेल तर हिमतीनं प्रश्न विचारायला शिका !

प्राची दुधाने 
वारसा सोशल फाऊंडेशन

Comments

  1. अप्रतिम लेखन 👌👍
    मनीला जमेल परिवर्तन करायला कारण तिला प्रश्न पडतात .
    हो मला पण प्रश्न पडतात कारण मी मनी
    सारखीच चिकित्सक आहे व माझी आई
    मनीच्या आईसारखीच आहे .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??