मन धाव घेतंय,विरून गेलेल्या क्षणांचा ठाव देतंय..
मन धाव घेतंय,
विरून गेलेल्या क्षणांचा ठाव देतंय.
वास्तवाचं भान राखतंय,
इतिहासाचं पान वाचतंय.
भूल अन चूक एकसंध रांधले,
स्मरण त्याचे मनी बांधले.
सुख,दुःखाचा जीवन ठेवा,
सोपा नसे हा खेळ जाणावा.
भूतकाळातील स्मृतिगंध जो,
आठवणींचे रान फुलवितो.
बुद्धीच्या ही पलीकडला,
तर्क भावनांचा कोण लावतो ?
क्षणाची त्या पत जाणं,
निसटून जाता देईल कोण ?
गेला क्षण न येई परतोनी,
वर्तमान ही शिळा होई घे समजोनी.
आठवणी गेल्या जरी विरून,
मनातून कोण नेईल त्यास चोरून ?
क्षणा क्षणांचा ठाव घे,
आठवणींचा गाव ले..
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment