जीवन-मृत्यू मधील अंतर,आयुष्य जगण्याचा खरा मंतर !
जीवन मृत्यू मधील अंतर,
आयुष्य जगण्याचा खरा मंतर !
जीवन मृत्यू एकाच रस्त्याची सुरुवात व अंत आहेत.
मृत्यू हे जीवनातील सर्वात मोठी हानी नसून,जीवन मृत्यूच्या भयाने जगण्यात तोटा आहे.इथे जिवंत कोणीच मुक्त होत नाही.मृत्यूशय्येवर प्रत्येकाला एक दिवस चढाव लागत.
जे संपते ते आयुष्य,
जो येतो तो मृत्यू.
शब्दांचा सारा खेळ..
संपणारे असले आयुष्य तरी तेच खरे,
बाकी काही जरी नसले बरे.
मृत्यू येतो अन सारं घेवून जातो,
आठवणींनी उर भरतो.
आयुष्य उदार अंतकरणाने व्यापक विचाराने जगा. प्रेम,आनंद,विश्वास प्रस्थापित करा.किती जरी चकवा मृत्यूला दिला,तरी तो चुकणार नाही.हे वास्तव आहे.पण ह्या कटू सत्याला सामोरे जाताना,धैर्याने उभे रहा. मनावरील जखमांना काळाचे मलम लावा.संघर्षाच्या राखेतून फिनिक्स पक्षासम पुन्हा उभारी घ्या.मृत्यूचे भय जिवनावर स्वार होऊ देऊ नका.मृत्यू अटळ आहे. आपण अमर निश्चित नाही,पण आपले विचार,कार्य असे निर्माण करा जे आजारावर होईल.जेव्हा जेव्हा तुमचं नाव निघेल जीवन जगण्याची नवं चेतना तुम्ही द्याल.विचाराने तुम्ही कायम जिवीत रहाल.
सखोल जीवन जगणारे मृत्यूचे भय बाळगत नाहीत. दुःख जीवन देते,मृत्यू जीवन घेते.जीवन जगणं एक कला आहे.ज्याला ती आत्मसात करता आली,तो मृत्यूचा बादशहा आहे.शेवटी काय,तर कणखर होऊन मृत्यूचे भय सोडून जीवनाचा आनंद हर एक क्षण घेत व देत रहाण्यात खऱ्या जीवनाचे सार आहे.परिस्थितीपुढे हार मानून पराभवाने मृत्यू कवटाळण्यात कसला जय..
आज मी श्वास घेतला,त्यापेक्षा मौल्यवान काय आहे ?
प्रत्येक दिवस नसतो जिंकण्याचा,
कधी कधी हारण्यात हि शान आहे.
विखुरलेल्या आयुष्याची पानं गोळा करणं,
हे आपलंच काम आहे.
कधी झाला दुबळा मनाने तर खचू नको,
कणखर तुझा बाणा हे विसरू नको.
आधी नी अंत आहे जीवन व मृत्यू.मधला मार्ग तुझे जीवन आहे.ते सार्थ कर.मृत्यूवर सांत्वन करण्यापेक्षा,जीवन जगण्यावर भर दे..
प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन
Comments
Post a Comment