क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिनानिमित्त शिवाभिवादन !

६ डिसेंबर..क्रांतिसिंह नाना पाटील या क्रांतिसूर्याचा स्मृतिदिन  !🚩👏🏻
लहानपणापासून त्यांच्या विषयी खूप ऐकलं आणि वाचल होत.त्यांचा तो रांगडेपणा,करारीपणाचा,आधी स्वातंत्र्यसाठी क्रांती आणि नंतर समाजसुधारक म्हणून स्वतःच उभ आयुष्य झोकून दिलेले,सत्यशोधक, प्रयत्नशील,परिवर्तनकारी,रूबाबदार,गांधीवादी व स्वतःचे विचार असलेले, उच्च विचारसरणी व साधी रहानी असे क्रांतिसिंह नाना पाटील.सतत नवचैतन्य व नवविचार निर्माण करणार व्यक्तिमत्व,तसेच मातीशी असणार नात घट्ट असलेले. 
आज देश स्वातंत्र्य होवून ७०हून अधिक वर्ष झालेले असताना देखील आपण मानसिक गुलामगीरी व वैचारिक पारतंत्र्यातून अजून बाहेर पडू शकलो नाही याची खंत वाटते.आज देशाला नानांच्या पुरोगामी कृतिशील विचारसरणीची अवश्यकता आहे.नानांचे वारसदार सर्वपरीने नानांचे विचार समाजा पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण,आपण सर्वांनी नानांचे चरित्र अभ्यासून त्यांचे विचार,आचार हे सुधारित समाजाचे व खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारत देशाची निर्मिती करण्यास आचरणात आणणे गरजेचे आहे.प्रस्थापित विध्वंसक प्रवृत्तीला मुळापासून उपटून नष्ट करण्यासाठी प्रत्येक घरात नानांचे विचार पोहोचणं हि काळाची गरज आहे.लढा देण्याच्या पद्धती जरी बदलल्या असल्या तरी लढा तोच आहे. शेतकरी,कष्टकरी,सर्वसामान्य जनतेवर होणारा अन्याय रोखला पाहिजे.त्यासाठी नानांचे वैचारिक वारसदार होवून आपण ही प्रयत्नशील असाव अस मला वाटत.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कृतीशील राष्ट्राचे स्वप्न पाहिले होते आणि ते त्यांनी प्रतिसरकार स्थापन करून साध्य ही केले होते.ग्रामीण भागाचा विकास, शेतकर्यांच्या हक्कासाठी लढा, स्त्रीशिक्षणाचासाठी प्रयत्न, दारूबंदीसारखे कार्य क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले.आज ही ह्या क्षेत्रांमधे कार्य करण्याची अत्यंत गरज भासत आहे.नानांचे वैचारिक वारस होवून हे कार्य सर्वांनी करावे.ज्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या क्रांती घडवणाऱ्या  सिंहाला आपण शिवाभिवाद्न करण्यास पात्र ठरू !
क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त  शिवाभिनंदन !!
🚩👏🏻

प्राची दुधाने
वारसा फाऊंडेशन

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान दिन

कोरोना आणि लस - एक षडयंत्र

"बापू,देश की सेहत के लिये क्या तु हानिकारक है"??